सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

  • सार्वे प्र. लो. शिवारातुन पन्नास हजार रुपये किंमतीच्या बैलाची चोरी.

  • बिबट्याचा हल्ल्यात एक मजूर जखमी, अंबे वडगाव ते पाचोरा रस्त्याच्या कामावरील मजूरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›कोरोना लसीकरण हे प्रत्येकासाठी मिशन व्हावे.(डॉ.राहुल निकम)

कोरोना लसीकरण हे प्रत्येकासाठी मिशन व्हावे.(डॉ.राहुल निकम)

By Satyajeet News
May 1, 2021
394
0
Share:
Post Views: 38
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०५/२०२१

शासनाने ह्या कोविड च्या गंभीर परिस्थितीत जनतेसाठी दि.०१/०५/२०२१,शनिवार पासून व्यापक स्वरूपात लसीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे. नक्कीच लसीकरणामुळे कोरोनाच्या संसर्गाला प्रतिबंध घालण्यास मदत होईल.

या पार्श्वभूमीवर *अप्पासाहेब र.भा.गरुड महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एकक व ग्लोबल युवा फाउंडेशनच्या वतीने *एक दिवसीय वेबिनार* चे आयोजन दि.३०/०४/२०२१, शुक्रवार रोजी झूम आणि युट्यूब या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वासुदेव आर.पाटील, उदघाटक कबचौउमवि चे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. पंकजकुमार नन्नावरे तर प्रमुख मार्गदर्शक शेंदुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ राहुलजी निकम हे होते.

या कार्यक्रमाची प्रस्तावना महाविद्यालयाच्या रासेयो एककाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.दिनेश प्रकाश पाटील यांनी केले, त्यांनी गेल्या वर्षा पासून कोरोना काळात रासेयो एकक करीत असलेल्या विविध समाजपयोगी उपक्रमांची माहिती दिली तसेच लसीकरणा विषयी घेण्यात आलेल्या वेबिनारच्या आयोजना मागिल भूमिका मांडली.

या वेबिनार प्रसंगी प्रमुख उदघाटक म्हणून कबचौ उमवि,जळगांव चे रासेयो संचालक प्रा.डॉ.पंकजकुमार नन्नवरे यांनी आपल्या उदघाटकीय भाषणात लसीकरणाच्या मोहिमेत रासेयो स्वयंसेवकांनी स्वतःची योग्य व सुरक्षित काळजी घेऊन मदत कार्य करावे असे आवाहन केले.तसेच त्यांनी उपस्थितांसमोर शेंदूर्णी रासेयो एकक कोरोना काळात करीत अससेल्या समाजपयोगी उपक्रमांबद्दल कौतुक केले.

यानंतर वेबिनारचे प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले तज्ञ मार्गदर्शक डॉ.राहुल निकम यांनी उपयुक्त मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या व्याख्यानातुन लसीकरणासंधरबात नागरिकांच्या मनात असणाऱ्या विविध प्रश्नांनावर मार्गदर्शन केले. त्यांनी प्रबोधनात्मक शैलीत लसीकरणाचे महत्व तसेच लसीकरणाच्या आधी व नंतर घ्यावयाची काळजी या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

यानंतर प्रश्न उत्तराच्या सत्रात सहभागीसोबत संस्थेचे अध्यक्ष मा.संजयजी गरुड यांनी उपस्थिती देऊन ‘प्लाझमा दान’ करण्यासाठीची तांत्रिक प्रक्रिया समजून घेतली.ते नुकतेच कोरोना आजाराशी लढा देऊन बरे झाले आहेत.प्लाझमा हा कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी उपयोगी ठरत आहे.या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘प्लाझमा दान’ करण्याचा संकल्प बोलून दाखविला. जेणे करून कुण्या बधिताला त्याचा लाभ व्हावा. त्यांच्या या संकल्पाने उपस्थित इतरांना प्रेरणा मिळाली.

आपल्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वासुदेव आर.पाटील यांनी लसीकरणाची गरज व रासेयो स्वयंसेवकांची भूमिका यावर प्रकाश टाकला. त्यांनी उपस्थितांना लसीकरणामुळे कोरोना संसर्ग कमी होण्यास खूप मदत होईल असे सांगितले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ.श्याम साळुंखे,रविंद्र आर.बोरसे
संचालक, ग्लोबल युवा फाउंडेशन मोराड,चोपडा महाविद्यालयाचे प्रा.दिनानाथ पाटील,साक्री महाविद्यालयाचे प्रा.डॉ.योगेश चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या वेबिनार साठी एकूण ३२७ जणांची नोंदणी झाली त्यापैकी २९८ स्पर्धकांना ऑनलाइन प्राणपत्र वितरित करण्यात येणार आहेत.
या वेबिनार मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातुन स्पर्धेक सहभागी झालेले होते.
या वेबिनार चे सूत्रसंचालन रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.सुजाता सी.पाटील यांनी तर आभार प्रा.डॉ.वसंत एन.पतंगे यांनी केले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

कुऱ्हाड बुद्रुक येथील ९५ वर्षाच्या आजीबाईंनी केली ...

Next Article

आसनखेडा येथील सरपंच यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    ग्रामविकास मंडळाकडून सार्वजनिक न्यास नोंदणी अधीक्षकांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली.

    March 27, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    बापू तुम्ही खरच म्हणाला होतात, खेड्याकडे चला.

    October 2, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    सुमित पंडित यांचा वाढदिवस व जागतिक रक्तदान दिनानिमित्त केले २१ दात्यानीं रक्तदान,सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम.

    June 15, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा येथील गो.से.हायस्कूल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप.

    July 17, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    आमदार किशोर आप्पा पाटील. यांनी घेतला कोरोना स्थितीचा आढावा.

    March 31, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    अंबे वडगाव येथील जिल्हापरिषद शाळेच्या शिक्षकांचा आगळावेगळा उपक्रम.

    November 28, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    भाजपा तर्फे पाचोरा येथे उद्या मीटिंग

  • आपलं जळगावराजकीय

    लोहटार ग्रामपंचायत सरपंचपदी सौ.मनीषा वाणी तर उपसरपंचपदी श्री. योगेश माळी.

  • ब्रेकिंग न्यूज

    महासर माता राईस मिलच्या चार भिंती आड दडलंय काय ? पंचक्रोशीतील गावागावातून चर्चेला उधाण.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज