कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, सोयगाव पोलिसांचे पथसंचलन.

प्रज्वल चव्हाण.(गोंदेगाव ता.सोयगाव)
दिनांक~ २३/०४/२०२१
शासनाचे *“ब्रेक दि चेन”* या कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाय योजनेच्या अनुषंगाने औरंगाबाद ग्रामीण जिल्हयात कोविड-१९ संसर्गाचा प्रादूर्भाव आटोक्यात ठेवण्याचे दृष्टीकोनातुन पोलीस अधीक्षक मा.अक्षदा पाटील. यांनी कोविड-१९ प्रादूर्भाव उपाय योजनांच्या दृष्टीकोनातुन जिल्हयात धडक कारवाई करण्याकरिता पोलीसांच्या ०६ भरारी पथकांची नेमणुक केली असुन या पथकांद्वारे संपुर्ण जिल्हयातील मोठ्या लोकवस्तीचे गावे/ बाजारपेठा/चौक/ भाजी- फळे मार्केट/ इत्यादी ठिकाणी गस्त ठेवली जाणार आहे. याकरिता सोयगाव येथील पोलीस निरीक्षक यांनी सूचनांचे पालन करीत गोंदेगाव येथे पथसंचलन केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गोंदेगाव येथे गावातील नागरिकांना यावेळेस सूचना देण्यात आल्या की शासन निर्देशानुसार विहीत करण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवेतील आस्थापना यांना देण्यात आलेल्या सकाळी ०७ ते ११ यामुदतीतील वेळपेक्षा जास्त वेळ आस्थपना उघडी ठेवल्यास, तसेच विनामास्क व विनाकारण रस्त्याने फिरून संचारबंदी चे उल्लंघन करणा-या व्यक्तींविरोधात यापथकांद्वारे धडक कायदेशिर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे शासनाद्वारे आंतर जिल्हा व अंतर राज्य प्रवास बंदीचे आदेश निर्गमित केलेले असुन फक्त अत्यावश्यक सेवा/वैद्यकिय आपत्कालीन परिस्थीतीत किंवा कुटूंबातील गंभीर आजार अशा अनिवार्य घटनामध्ये आंतर जिल्हा प्रवासास परवानगी देण्यात आली असल्यामुळे *मा. पोलीस अधीक्षक यांचे सुचनानुसार औरंगाबाद ग्रामीण जिल्हयात प्रवेश करण्यासाठी असलेल्या ०७ जिल्हासिमा (बार्डर) सिल करण्यात आलेल्या आहेत. याठिकाणी २४ तास पोलीसांची चेक पोस्ट नेमण्यात आलेली असुन वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.
औरंगाबाद ग्रामीण जिल्हयात प्रवेश करण्यासाठी त्यांच्या जिल्हाच्या प्रशासनाची परवानगी (प्रवास पास) जवळ बाळगणे व चेक पोस्टवर पोलीसांना दाखवणे बंधनकारक आहे. *विना पास प्रवास कोणालाही औरंगाबाद ग्रामीण जिल्हयात प्रवेश मिळणार नाही.* तसेच अत्यावश्यक कारणासाठी औरंगाबाद ग्रामीण जिल्हातुन *इतर जिल्हयात प्रवासासाठी नागरिकांकरिता ई-पासची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी* *Covid19.mhpolice.in* या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.
यासह सध्याच्या परिस्थितीत विनाकारण काही एक गरज नसतांना घराबाहेर पडुन रस्त्याने फिरणा-या नागरिकांची रस्त्यावरच कोविड-१९ संसर्गाबाबत चाचणी स्थानिक प्रशासनाचे सहयोगाने संयुक्तपणे करण्यात येत असुन यामध्ये *पोलीस ठाणे सोयगाव ग्रामीण यांनी येथे नागरिकांची चाचणी केली . या सर्वांना वैद्यकिय सल्यानुसार उपचार कामी स्थानिक शासकिय रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे. तसेच सोयगाव पोलीसांनी कोविड-१९ लसीकरण बाबत गोंदेगाव येथे जनजागृती मोहीम राबवन्यात आली.
औरंगाबाद ग्रामीण जिल्हयात संचारबंदी/ जमावबंदी आदेशाची १०० टक्के अंमलबजावणी करण्यात येत असुन अत्यावश्यक सेवा ज्यांना सकाळी ०७.०० ते ११.०० पर्यंत वेळ मर्यादा देण्यात आली अशा आस्थापना सुध्दा निर्धारित वेळात बंद करण्यात आलेल्या आहेत.