४ डिसेंबरला कुसुंब्यात महामस्तकाभिषेक सोहळ्यानिमित्त जोरात तयारी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/१२/२०२१
कुसुंबा येथे शनिअमावस्यादिनी भगवान मुनिसुव्रतनाथ यांच्या महामस्तकाभिषेक महोत्सव सोहळा दिनांक ४ डिसेंबर शनिवार रोजी सुरक्षित अंतर ठेवुन शासनाच्या आदेशाप्रमाणे मोठ्या उत्साही मंगलमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी पार्श्वनाथ सेवा समिती चे पद्मावती युवा मंच यांनी जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहिती कुसुंबा अतिशय जैन क्षेत्राचे विश्वस्त आणि खान्देश जैन समाजाचे प्रसिद्धीप्रमुख सतीश वसंतीलाल जैन तसेच महेंद्र हिरालाल जैन यांनी दिली.
प्राचीन अतिशय क्षेत्रावरती शनीअमावस्या दिनी प्रात:काळी सकाळी साडेसात वाजता महामस्तकाभिषेक महोत्सव धार्मिक विधीस ओम राजेंद्र जैन हस्ते पठनाने प्रारंभ होईल. नंतर भगवान मुनिसुव्रतनाथ यांच्या जिनबिंब प्रतिमावरती पंचामृत महामस्तकाभिषेक भाविकांच्या उपस्थीतीत संपन्न होईल. पूजन पाठ विश्वशांतीसाठी कोरोना महामारी व ओमिक्रॉन संकट निवारणासाठी शांतीमंत्र वाचन महाआरती विसर्जन पाठ असे विविध धार्मिक कार्य क्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भगवान कुंथुनाथ यांचे हे जागृत देवस्थान मानले जात असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नवस केले जातात .ते फेडण्यासाठी व दर्शनासाठी भाविकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असते एरविही प्रतिदिन भाविकांची वर्दळ असते .याकामी वालचंद जैन ,पारस जैन ,पंकज जैन ,राहुल जैन ,रोशन जैन, अशोक जैन, विपुल जैन, प्रमोद जैन, राजेंद्र जैन, चंदू जैन, महावीर जैन, गौरव जैन, स्वप्निल जैन, मयूर जैन, सम्यक जैन, परम जैन, राजू जैन, आदि. पद्मावती युवा मंच व पार्श्वनाथ सेवा समितीचे सदस्य विशेष परिश्रम घेत आहे.