सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील महादेव मंदिरावर बाबांचे पुनरागमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

  • पिंप्री धरणावर अनाधिकृत ताबा घेऊन माती उचल करणाऱ्यांकडून सक्तीने वसूली.

  • पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या बदलीसाठी हरीभाऊ पाटील यांचा आंदोलनाचा इशारा.

  • पाचोरा पीपल्स बॅंकेने मुस्ताक पिंजारी यांना दिला पत्ता ठेवून झब्बू, वडिलोपार्जित घराची परस्पर विक्री.

  • अवैध वाळू वाहतूक करतांना ३५ वर्षीय चालकाचा मृत्यू, ट्रॅक्टर मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›डॉ. प्रविणजी मुंडे यांची धडक कारवाई, रेमडेसिवीरचा काळा बाजार करणारे रॅकेट उघडकीस.

डॉ. प्रविणजी मुंडे यांची धडक कारवाई, रेमडेसिवीरचा काळा बाजार करणारे रॅकेट उघडकीस.

By Satyajeet News
April 23, 2021
1179
0
Share:
Post Views: 43
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०४/२०२१

जळगाव येथे आज कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणारे रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारे रॅकेट जळगाव पोलिसांनी शोधून काढले असून एकुण आठ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. जळगाव जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ.मुंढे बोलत होते.

एका प्रकरणात ६ व दुस-या प्रकरणात २ अशी जादा दराने विक्री झालेली एकुण ८ रेमडीसीवीर इंजेक्शन्स ताब्यात घेण्यात आली आहेत. सरकारी दराच्या तुलनेत कमाल ३५ हजार रुपयांपर्यंत या रेमडेसिवीर इंजेक्शनची चढ्या दराने बेकायदा विक्री सुरु होती. ती जळगाव पोलिसांनी उधळून लावली आहे. याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या गुन्ह्यात ९ आरोपी निष्पन्न करण्यात आली असून त्यातील एकुण ८ आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत. अटकेतील आरोपींकडून ६ इंजेक्शन्स हस्तगत करण्यात आली आहेत. दुस-या गुन्ह्यात २ इंजेक्शन्स हस्तगत करण्यात आली आहेत.

जळगाव येथील ज्युपीटर हॉस्पीटलचा वार्ड बॉय शुभम शार्दुल याच्यापासून तपासाची लिंक लागण्यास सुरुवात झाली. शुभम शार्दुल याने मयुर विसावे या वैद्यकीय प्रतिनिधीकडून इंजेक्शन्स घेतले होते. मयुर विसावे याने ते इंजेक्शन्स आकाश जैन (नवकार फार्मा मेडीकल) याच्याकडून घेतले होते. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

दुस-या प्रकरणात दहा जणांची लिंक आढळून आली. त्यापैकी नऊ जण अटक करण्यात आले आहेत. या प्रकरणातील शेख समीर शेख सगीर याच्यापासून तपासाची लिंक लागली. शेख समीर हा ऑर्कीड हॉस्पीटल येथे लॅब असिस्टंट म्हणून कामाला होता. रेमडीसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणा-या टोळीची लिंक तपासली असता त्यात दहा आरोपी निष्पन्न झाले. त्यापैकी नऊ जणांना अटक करण्यात आली. या टोळीतील डॉ. तौफिक शेख हा फरार होण्यात यशस्वी झाला आहे. पोलिस त्याच्या मागावर आहे. डॉ. तौफिक शेख हा तांबापुरा येथील दवाखान्यात काम करत होता.वाढीव दराने कुणी रेमडेसिवीर इंजेक्शन्स विकत असतील वा कुणाला याबाबत माहिती असल्यास जळगाव पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी केले आहे. जनतेला थेट पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्याशी ७२१९०९१७७३ या क्रमांकावर देखील संपर्क साधता येणार आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि ...

Next Article

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, सोयगाव पोलिसांचे पथसंचलन.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    वनविभागाच्या अधिकाऱ्यांना उशिरा सुचल शहानपण, तक्रारीनंतर उगारला कारवाईचा बडगा.

    March 15, 2024
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    जनरेटर चोरी प्रकरणी मुख्य आरोपी सह साथीदार अटकेत,* सार्वे येथील प्रकार, एक दिवसाची पोलीस कोठडी…कसून शोध घेतल्यास खरे ...

    November 20, 2020
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    सोयगावच्या लाकुड व्यापाऱ्यांचा पिंपळगाव हरेश्र्वर येथील हॉटेलमध्ये ठिय्या, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी करतात त्याच्या भोवती ता,था,थैय्या.

    June 2, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    नांद्रा येथील तंटामुक्ती अध्यक्षांच्या शेतातील गोडाऊन मधून १८ क्विंटल कापूस लंपास अंदाजे एक लाख दहा हजाराचे नुकसान.

    October 16, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorizedक्राईम जगत

    कुऱ्हाड बुद्रुक येथील भैरवनाथ बाबा शेत शिवारातील विद्युत चोरांवर धडक कारवाई.

    November 23, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    रानडुक्कर घरात, वनविभागाचे अधिकारी दारात, कळमसरा व लोहारा येथून तीन संशयितांना अटक.

    June 23, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    वनविभागाचे अधिकारी उंटावरून शेळ्या चारत असल्याने बिबट्या मस्तावला.

  • Uncategorized

    बाल हक्काच्या संरक्षणासाठी बाल हक्क संरक्षण संघ महाराष्ट्र राज्य नेहमीच तत्पर. पाचोरा तालुकाध्यक्ष पदी निलेश मराठे.

  • पाचोरा तालुका.

    जिल्हापरिषद अंतर्गत येणाऱ्या शेरी पाझर तलावात शेतकऱ्याने केला मातीचा भराव, अरुण पवार यांची तक्रार.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज