पाचोरा शहरात दिपावलीची खरेदी करण्यासाठी उसळली गर्दी, वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीसांची दमछाक.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/११/२०२०
पाचोरा हे तालुक्याचे शहर व येथे दर शनिवारी भरणारा आठवडे बाजार त्यातच लक्ष्मीपूजनाचा दिवस या निमित्ताने पाचोरा शहर व खेड्यापाड्यातील जनता दिपावलीच्या सणानिमित्त लक्ष्मीपूजनचे साहित्य,घर सजावटीसाठी लागणारे तोरण,झेंडूची फुले,पणत्या,केरसुणी,मिठाई,फरसाण,कपडे,सोने ईतर साहित्य,वस्तू खरेदीसाठी आल्याने शहरातील रस्ते , सराफबाजार,महात्मा गांधी चौक,रथगल्ली,भडगाव रोड,स्टेशन रोड,बसस्थानक रस्त्यावर खरेदीदारांची एकच गर्दी उसळली होती. यानिमित्ताने पाचोरा शहराला यात्रेचे स्वरूप आले होते.
विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची दमछाक उडाली होती. कारण दुचाकी,चारचाकी वाहनांची गर्दी व ही वाहने लावतांना कुणीही कायदासूव्यस्थे बाबतीत कींवा रहदारीस अडथळा येणार नाही याची काळजी घेत नसल्याने
काही ठिकाणी स्वता पोलीस बांधवांना रस्त्यावरील वाहने ढकलून रस्ता मोकळा करवा लागत होता. हे करतांना काही दुचाकी लॉक असल्याने खुपच मेहनत करावी लागत होती. तर काही वाहनधारक पोलीस बांधवांशी हुज्जत घालत होते.
कोरोणा जवळजवळ नाहीसा होण्याच्या वाटेवर असल्याचे चित्र दिसत असून, लॉकडाउन कालावधीत घरातच अडकून पडलेल्यांना दिपावलीच्या खरेदीच्या बहाण्याने का होईना बाहेर फिरण्यासाठी संधी मिळाली या संधीचा फायदा घेण्यासाठी महिलावर्ग शाळा बंद असल्याने घरातच बसून बसून वैतागलेला विद्यार्थीवर्ग बाजारात मनसोक्त फिरतांना दिसून येत होता.अधिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नगरपालिकेचा अग्निशमन बंब चौकात उभा करण्यात आला असून पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.श्री.किसनराव पाटील.यांच्या मार्गदर्शनाखाली चौक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.