एक दिवस आपल्या छंदासाठी निमीत्ताने पाचोरा येथे रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०१/२०२१
पाचोरा शहरातील भडगाव रोड वरील शक्तीधाम येथे कै. डॉ. शरद विसपुते यांची पुण्यतिथी व २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त एक दिवस आपल्या छंदासाठी या महिलासाठी तालुका स्तरीय भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन २६ जानेवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत करण्यात आले होते ,यावेळी स्व. डॉ. शरद विसपुते यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या उपस्थितीत माल्यार्पण करण्यात येऊन स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला , यावेळी महिलांनी काढलेल्या विविध सुबक रांगोळ्या पाहून उपस्थित मान्यवरांनी सर्वांचे विशेष कौतुक केले , या स्पर्धेत ५० महिला सहभागी झाल्या होत्या , यात प्रथम क्रमांक ,दुसरा व तिसरा आणि उत्तेजनार्थ अशी बक्षिसे विजेत्या महिलांना रोख स्वरुपात अनुक्रमे – ११००/- ७००/- ५००/- रु .प्रमाणे देण्यात आले .यावेळी रमेश मोर , डॉ. चंद्रकांत विसपुते , डॉ.संकेत विसपुते , भैय्यालालजी महेंद्र अग्रवाल ,मोरे सर , मीना मोर , ज्योती अग्रवाल , सीमा अग्रवाल , सुनिता मोर , कल्पना मोर , यश मोर , आदी मान्यवर उपस्थित होते , स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री. कुलकर्णी सर ,शीतल महाजन ,संगीता अग्रवाल ,टीना अग्रवाल यांनी काम पाहिले .