दिव्यांग सेने मार्फत ३ डिसेंबरला जळगाव येथे आंदोलन
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/११/२०२०
दिव्यांग सेनेच्या माध्यमातून जळगाव महानगर पालिका येथे *जागतिक अपंग* दिनाच्या दिवशी *३ डिसेंबर* रोजी *आंदोलन* करण्यात येणार आहे.आंदोलना मध्ये प्रमुख उपस्थितीत दिव्यांग सेनेचे *राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रसादजी साळवी सर* हे राहणार आहे.दिव्यांग सेनेच्या माध्यमातून महानगर पालिकेला वारंवार पत्र व्यवहार करून देखील कोणत्याही प्रकारची ठोस पाऊले उचली नाही. त्यामुळे दिव्यांग सेनेच्या च्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यावेळी दिव्यांग सेना महाराष्ट्र सचिव श्री.भरत जाधव, दिव्यांग सेना जिल्हा अध्यक्ष श्री.अक्षय महाजन, जिल्हा उपाध्यक्ष शेख शकील, जिल्हा सचिव हितेश तायडे,सहसचिव ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा संघटक प्रदीप चव्हाण, जळगाव शहर अध्यक्ष भीमराव म्हस्के, नितीन सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येणार आहे. तरी समस्त दिव्यांग बांधव आणि दिव्यांग सेना पदाधिकारी यांनी सोशल डिस्टन्स आणि मास्क चा वापर करून उपस्थित राहावे ही विनंती.
➖️〰️➖️〰️➖️〰️➖️〰️➖️〰️➖️
*एकच ध्यास दिव्यांगाचा सर्वांगिण विकास*
🟡🟢🔵🟣🟢🟣🟢⚫🟣🔵🟢
*दिनांक:-* ३ डिसेंबर
*वेळ* :-सकाळी ९.००
*ठिकाण* :-जळगाव महानगर पालिके समोर
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼