वरसाडे ग्रामपंचायत निवड बिनविरोध अमोल शिंदे यांच्या प्रयत्नाला यश.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/१२/२०२०
भाजपा तालुकाअध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील वरसाडे प्र.बो. येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व सात जागांची बिन विरोध निवड झाली. वरसाडे ग्रामस्थ व ग्राम पातळीवरील सर्व स्थानीक जेष्ठ सामाजिक, व सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्ते यांच्या समन्वयातून गावाने नवा आदर्श स्थापित केला. आहे.
या निवडीबडद्दल गावात मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी अमोलभाऊ शिंदे यांनी सर्व बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांचे पुष्पहार घालून अभिनंदन केलव भावी वाटचालिसाठी शुभेच्छा दिल्या.
निवड झालेले उमेदवार खालील प्रमाणे
1. जगन्नाथ पंढरीनाथ पाटील
2. संदीप धनसिंग पाटील
3. साधनाबाई विकास पाटील
4. रत्नाबाई रामकृष्ण पाटील
5. प्रमिला जगन्नाथ पाटील
6. यशोदा श्रीराम भिल
7. मायाबाई विनोद मोरे
या प्रसंगी नरेंद्र पाटील (मा.कृ.उ.बा. समितीचे संचालक) भाजपा तालुका सरचिटणीस गोविंद शेलार,संजय पाटील, प्रशांत सोनवणे, गोकुळ चव्हाण, महेंद्र अशोक पाटील, सुरेश नारायण पाटील, मनोज रामकृष्ण पाटील, दिलीप सखाराम पाटील,पंकज जामसिंग पाटील हे उपस्थित होते.