पाचोरा शहरात तीन दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन : पालिकेतर्फे सक्त कारवाईचे संकेत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०३/२०२१
पाचोरा शहरातील तमाम नागरीक, व्यापारी व विक्रेते यांना या जाहिर आवाहनाद्वारे कळविण्यात येते की, कोवीड १९ या आजाराच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता खबरदारीची उपाययोजना म्हाणून म.जिल्हाधिकारी सो. जळगांव यांचेकडील दिनांक २६/०३/२०२१ रोजीच्या आदेशानूसार दिनांक २८/०३/२०२१ रविवार पासून ते दिनांक ३०/०३/२०२१ मंगळवार पर्येंत संपुर्ण जळगांव जिल्हयात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे.
या लॉकडाउनच्या काळात
१) सर्व बाजारपेठा, आठवडे बाजार बंद राहतील.
२) किराणा दुकाने व इतर सर्व दुकाने बंद राहतील.
३) किरकोळ भाजीपाला / फळे खरेदी विक्री केंद्र बंद राहतील.
४) शैक्षणीक संस्था / महाविद्यालय, खाजगी कार्यालये बंद राहतील.
५) सभा/ मेळावे/बैठका / धार्मिक स्थळे, सांस्कृतिक/धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद राहतील.
६) शॉपींग मॉल्स / मार्केट, बार्बर शॉप, स्पा, सलून, लिकर शॉप बंद राहतील
७) गार्डन, पार्क, बगीचे सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव प्रेक्षकगृहे, क्रिडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संमेलने बंद राहतील.
८) पानटपरी, हातगाडया, उघडयावर खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणे बंद राहतील. ९) खाजगी प्रवासी वाहतूक (अत्यावश्यक सेवा वगळून) बंद राहतील.
१०) दुध विक्री केंद्रे केवळ सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०७.०० वाजेपावेतो सुरु राहतील.
१२) कायद्याब्दारे बंधनकारक असणाऱ्या पूर्व नियोजित वैधानिक सभा Online पध्दतीने घेता येतील.
१२) कोविड-१९ लसीकरण कार्यक्रम सुरु राहील.
१३) होळी व धुलीवंदन निमित्त कोणत्याही प्रकारे सामुहीक / सार्वजनिक कार्यक्रम साजरा करण्यास सक्त मनाई राहील.
सदर आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे आढळुन आल्यास आदेशाचे उल्लं घन म्ह.णून संबंधीतांवर भारतीय दंडसंहिता १८६० (४५) चे कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० व फौजदार प्रक्रिया संहिता १९७३ चे तरतूदीनूसार कारवाई करण्यात येईल याची गांभिर्याने नोंद घ्यावी. गंभीर इशारा पाचोरा नगरपरिषद मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर मॅडम यांनी दिला आहे.