सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • माजी जिल्हापरिषद सदस्य मा. श्री. मधुकर भाऊ काटे लोकमत लोकनायक पुरस्काराने सन्मानित.

  • वरसाडे तांडा येथील २६ वर्षीय तरुणाचा ट्रॅक्टर अपघात दुर्दैवी मृत्यू.

  • शेंदुर्णी शहरात गोळ्या, बिस्किटाच्या दुकानातून प्रतिबंधित गुटख्याची सर्रास विक्री कारवाईची मागणी.

  • जरंडी गावात भरवस्तीत वाहनात गॅस भरण्याचा अड्डा सुरु, मोठ्या अपघाताची शक्यता कारवाईची मागणी.

  • शिक्षणक्षेत्रातील लबाड लांडग्यावर कारवाई होणार का ? जळगाव जिल्ह्यातील सुज्ञ नागरिकांचा प्रश्न.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›वडगाव कडे येथे वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला मारहाण. पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल.

वडगाव कडे येथे वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला मारहाण. पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल.

By Satyajeet News
August 13, 2021
419
0
Share:
Post Views: 246
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०८/२०२१

सगळीकडे पावसाने दडी मारली असून पाऊस न येण्याचे कारण म्हणजे वृक्षतोडीमुळे निसर्गाचा होणारा ऱ्हास असे म्हटले जाते. याकरिता बेसुमार होणारी वृक्षतोड थांबवण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लादले असतांनाच पाचोरा तालुक्यात एका बाजूला वृक्षारोपण करून वृक्ष लागवडीचे शेकडो फोटो प्रसार माध्यमे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून बघावयास मिळतात परंतु दुसरीकडे आजही मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. याचे एकमेव कारण म्हणजे वनविभागाने घेतलेले अर्थपूर्ण झोपेचे सोंग असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

ऑगस्ट महिना सुरु असून आत्ता सुध्दा पाचोरा तालुक्यातील वडगाव कडे शिवारात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. या अवैध वृक्षतोडीबाबत तक्रार करणाऱ्या अर्जदारास व या वृक्षतोडीचे वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारास संबंधित वृक्षतोड करणाऱ्या शेतकऱ्यांने जीवे मारण्याची धमकी देत पत्रकाराला मारहाण केली याबद्दल मारहाणीची तक्रार देण्यासाठी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला जात असतांना रस्त्यावर अडवून दिनांक १३ ऑगस्ट शुक्रवारी अशी दोन वेळेस बेदम मारहाण केल्याची घटना वडगाव कडे येथे घडली असून याबाबत रितसर तक्रार दाखल केली असल्याचे खात्रीलायक समजते.

सविस्तर वृत्त असे की वडगाव कडे व शिवारात विकास गोपाळ पाटील यांची शेतजमीन गट क्रमांक १८/१/ब/अ ही असून याच शेतजमिनी आहे.यांच्या शेताजवळच शिव असल्याने विशाल रघुनाथ पाटील यांचा काही एक संबंध नसतांना तसेच महसूल विभाग किंवा वनविभागाची रितसर परवानगी न घेता शेतकरी विकास गोपाळ पाटील यांची कुठलीही संमती न घेता लाकूड व्यापाऱ्याला विकल्याने ती झाडे लाकूड व्यापाऱ्याने कापली असता याबाबत विकास गोपाळ पाटील जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने विकास पाटील यांनी पाचोरा वन विभागाकडे रीतसर तक्रार देऊन वृक्षतोडी बद्दल कारवाई होण्यासाठी मागणी केली होती.


या तक्रारीच्या अनुशंगाने व तक्रारदार सख्खा भाऊ असल्याने तसेच हिरव्यागार झाडांची कत्तल झाल्यामुळे पुण्यनगरीचे पत्रकार विनोद पाटील कापलेल्या झाडांचे छायाचित्र घेण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी रघुनाथ भास्कर पाटील व विशाल रघुनाथ पाटील या दोघांनी मिळून विनोद पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिली व मारहाण केली याबाबत विनोद गोपाळ पाटील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी जात असतांना रघुनाथ भास्कर पाटील व विशाल रघुनाथ पाटील यांनी विनोद पाटील यांना रस्त्यावर अडवून पुन्हा मारहाण केली या मारहाणीत विनोद गोपाळ पाटील यांना जबर मार लागला असून हाताला अस्थिभंग झाल्याचा संशय आहे.

मारहाणीत दाताला मार लागल्याने जखमी झालेले विनोद पाटील.

या मारहाणी बाबत पत्रकार विनोद पाटील यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा नोंद केला असून कारवाईची मागणी केली आहे. मात्र उजव्या हाताला जास्त मार लागुन अस्थिभंग झाल्याचा अंदाज असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पाचोरा येथे पाठवण्यात आले आहे.

या घटनेचा पंचक्रोशीतून निषेध नोंदवला जात असून राजरोसपणे होणाऱ्या हिरव्यागार वृक्षांची कत्तल कायमस्वरूपी थांबवावी अशी मागणी सुज्ञ नागरिक व निसर्गप्रेमी कडून केली जात आहे.

*पावसाळ्यातही वीरप्पन ची पिल्लावळ सक्रिय*
उन्हाळा संपून पावसाळा लागला ऑगस्ट महिन्यात पाचोरा तालुक्यातील वडगाव कडे, नांद्रा, सामनेर, अंबे वडगाव, कुऱ्हाड, लोहारा, पिंपळगाव हरेश्वर, कळमसरा या परिसरातील शेत शिवारात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असून या लाकूड व्यापाऱ्यांना वनविभागाकडून छुपा पाठिंबा मिळत असल्याने दिवसाढवळ्या राजरोसपणे हिरव्यागार वृक्षांची कत्तल केली जात असल्याचे दिसून येते याबाबत निसर्गप्रेमींनी वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता एक तर उडवाउडवीची उत्तरे मिळतात किंवा भ्रमणध्वनी किंवा कार्यालयीन फोन स्वीकारले जात नाही तरी या अधिकाऱ्यांची चौकशी होऊन कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

वरखेडी येथे रानभाज्या महोत्सव साजरा.

Next Article

दिव्यांग व्यक्तींचे प्राथमिक तपासणी शिबिर संपन्न आमदार ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    वाडी येथून एक कोटी रुपयांचा कापूस घेऊन फरार झालेल्या व्यापाऱ्याला पिंपळगाव हरेश्र्वर पोलिसांनी केले जेरबंद.

    January 25, 2023
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    धरणगाव येथील बालिकांचा लैंगिक छळ करणाऱ्या नराधमाला कठोरात, कठोर शासन व्हावे. युवासेना युवती विस्तारक शिवसेना आघाडीची मागणी.

    March 8, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    बैल शेतात घुसल्याच्या वादातून वाडी येथे एकाचा खुन.

    November 30, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पहूर येथील सराफी व्यापाऱ्याचा संशस्यास्पद मृत्यू, घातपात की अपघात पोलिसांसमोर मोठे आव्हान.

    August 13, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    आले पोलीसांच्या मना तेथे कोणाचे चालेना, पाळधी शिवारातील गावठी हातभट्टी उध्वस्त.

    March 25, 2024
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    विनयभंग झालेल्या पिडीत तरुणीने संतापातून केला आत्महत्येचा प्रयत्न.

    February 12, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    बापाच्या प्रचारासाठी लेकर सरसावली, डॉ. प्रियंका व सुमित या भाऊ, बहिणीनं पालथा घातला मतदारसंघ.

  • ब्रेकिंग न्यूज

    अमोल शिंदे हा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा अध्यक्ष, आमदार किशोर आप्पा यांची जहरी टीका.

  • क्राईम जगत

    लोहारी ते पाचोरा दरम्यान रस्त्यावर दुचाकीस्वारास लुटण्याचा प्रयत्न.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज