गरुड महाविद्यालय शेंदुर्णीच्या रणरागिनींची देशसेवेसाठी निवड.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०१२०२१
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनीं स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन देशसेवा करण्याची संधी त्यांना प्राप्त झालेली आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या दोन्ही रणरागिणींचा आई-वडिलां समवेत सत्कार करण्यात आला.
एकीकडे मुलींचे संरक्षण करण्यासाठी उपाय योजना केल्या पाहिजेत असा सूर निघतो तर दुसरीकडे याच मुली देशसेवेसाठी स्वतःहून तयार होतात तेव्हा ती सर्वांसाठी अभिमानाची बाब असते. अशाच गरुड महाविद्यालयातील
तृतीय वर्ष वाणिज्य ला असलेली कू.पूजा अशोक पाटील या आंबेवडगाव च्या विद्यार्थिनीने कठोर परिश्रमातून सी.आय.एस.एफ मध्ये जागा मिळवली आहे. तिचा भाऊ सुद्धा देशसेवेसाठी कमांडो म्हणून कार्यरत आहे. घरातून तिला प्रेरणा मिळाली. तृतीय वर्ष विज्ञान या वर्गात शिक्षण घेत असलेली कू.शुभांगी सुनील पाटील या नाचणखेड्यातील विद्यार्थिनीचे एस.एस. बी. मध्ये निवड झाली. शुभांगी या चार बहिणी आहेत . मुलगा नसतानाही चारही मुलींमधून शुभांगी हिने निवडलेले क्षेत्र अभिमानास्पद असल्याचे वक्तव्य तिच्या आई-वडिलांनी केले. शेंदुर्णी सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत आणि महाविद्यालयात असणाऱ्या खेळाच्या सुविधांचा वापर करत इतिहासात नोंद व्हावी असे कार्य केलेले आहे.शुभांगी आणि पूजा या दोघांच्या यशाबद्दल दी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष दादासो. संजयजी गरुड, सचिव दाजीसो. सतीशजी काशीद, महिला संचालिका सौ.उज्वलाताई काशीद सहसचिव श्री दिपकजी गरुड, वस्तीगृह सचिव श्री कैलास देशमुख, जिल्हा परिषद सदस्य सौ सरोजनीताई गरुड, संस्थेचे सर्व मान्यवर संचालक मंडळ,पदाधिकारी सदस्य, प्राचार्य डॉ. व्ही. आर .पाटील सर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी अभिनंदन आणि कौतुक केले. सूत्रसंचालन डॉ. योगिता चौधरी यांनी केले, कार्यक्रमाचे संयोजन फिजिकल डायरेक्टर डॉ. महेश पाटील आणि राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. दिनेश पाटील यांनी केले.
या दोन्हींची अनुकरण करत इतर विद्यार्थ्यांनी ही असे यश संपादन करावे असे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले.