समाजसेवक सुमित पंडित व सौ. पुजा पंडित यांना सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार प्रदान.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०३/२०२२
आजच्या धकाधकीच्या जीवनात अत्यंत बिकट परिस्थितीत समाजातील गरजु, पिडीत, अनाथ व इतर वंचित घटकांसाठी समाज उपयोगी विविध ४२ उपक्रम राबवून तरुणांसाठि प्रेरनास्थान ठरलेले समाजसेवक सुमित पंडित व सौ. पुजा पंडित यांना सावित्रीबाई फुले गौरव पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले.
नवीन प्रयास बहुद्देशिय संस्था औरंगाबाद यांच्या वतीने प्रथम वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन कार्यक्रमाच्या डॉ. मनोहर बंन्सवाल (बालकल्याण समिती अध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. सुनिल उमाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भावसिंगपुरा औरंगाबाद येथे आयोजीत करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सुरवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतीमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरवात करन्यात येऊन, रक्तदान करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
तदनंतर सत्कारमूर्ती समाजसेवक सुमित पंडित व समाजसेवीका सौ. पुजा सुमित पंडित यांना सन २०२२ चा सावीत्रीबाई फुले गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये राज्यस्तरीय सामाजिक, क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या कार्याची दखल घेत पुरस्कार सोहळ्यात पुरस्कारासाठी योग्य व्यक्तींची दखल घेत निवड करण्यात येते.
म्हणून यावर्षी सावीत्रीबाई फुले गौरव या पुरस्कारासाठी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या औरंगाबाद येथील सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या माणुसकी समुहाचे अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित व समाजसेविका सौ. पुजा पंडित यांच्या कार्याची दखल घेत सावीत्रीबाई फुले गौरव पुरस्कार देन्यात आला आहे.
ह्या पुरस्काराचे स्वरूप शाल श्रिफळ सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र वृक्ष देऊन उपस्थित माण्यवरांच्या गौरवण्यात आले. या समाजरत्न पुरस्कारामुळे समाजात समाजसेवक सुमित पंडित व पुजा पंडित त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. सुमित पंडित यांना मिळालेला हा ८८ वा पुरस्कार आहे. या आधी त्यांना महाराष्ट्रातुन विविध ८७ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच पुजा ताईंचा चा हा २२ वा पुरस्कार आहे. या आधी पुजा ताईंना २१ पुरस्काराने सन्मानित करन्यात आले आहे.
हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा शंकुतलाबाउ शेजवळ, अंजली दाभाडे, वैशाली शेजवळ, सरीता खंडाळे, मनिषा जाधव, मनीशा खंडाळे, सुकेशनी थोरात, आदिनी विशेष परीश्रम घेतले.