आईवडीलांच्या स्मरणार्थ पि.डी.बडोला माध्यमिक विद्यालयात बांधली पाण्याची टाकी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०४/२०२१
एकेकाळी खेडेगावात टपरीवजा किराणा दुकानाचे माध्यमातून पाचोरा तालुक्यातील वरखेडी या गावात आपला व्यवसाय सुरु केला प्रामाणिक राहून व्यवसाय करतांनाच व्यवसायाच्या माध्यमातून १९७२ दुष्काळी परिस्थितीत गोरगरिबांना होईल तेवढी मदत करत सोबतच आयुर्वेदिक जडी बुटी ठेवून जनतेची सेवा करणारे वरखेडी येथील आसपासच्या पंचवीस खेड्यात प्रसिद्ध असलेले स्व.भिकचंद सुरमल जैन. व त्यांच्या खांद्याला खांदा देत घरसंसाराचा गाडा ओढणाऱ्या त्यांच्या धर्मपति स्व. लिलाबाई भिकचंद जैन. यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मा.श्री. इंदरचंद भिकचंद जैन, मा.श्री. किलाचंद भिकचंद जैन, मा.श्री. धरमचंद भिकचंद जैन. व मा.श्री. हिराचंद भिकचंद जैन. या चारही सुपुत्रांनी आपण समाजाचे काही देणे लागतो जनसेवा हिच ईश्वर सेवा अशी भावना उराशी बाळगून आईवडीलांच्या स्मरणार्थ वरखेडी येथील पि.डी.बडोला माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाण्याची टाकी बांधून टाकी पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर प्लेव्हर बॉक्स बांधून दिले त्यांच्या या सदभावनेबद्दल पंचक्रोशीतील जनतेतून त्यांचे अभिनंदन होत आहे.