अनेकांचे पाप, कोण असेल खरा बाप पिंपळगाव हरेश्वर पोलिसांसमोर मोठे आव्हान.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०२/२०२१
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे एका महिलेच्या मदतीने दलित समाजातील २० वर्षीय तरुणीला जिवे मारण्याची धमकी देत शरीर संबंध ठेवण्यासाठी भाग पाडून काही नराधमांनी एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये संबंधीत तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याने यातूनच ती गरोदर राहिली व एका गोंडस मुलीला जन्म दिला याबाबत संबधित पिडीत तरुणीला हा त्रास अस्याह झाल्यावर जिवाची पर्वा न करता सरळसरळ पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये हजर होत एका महिलेसह पाच इसमांची नावे सांगत आपली आपबिती कथन करुन संबंधितिविरुध्द तक्रार नोंवली आहे.
याची दखल घेत पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. निताजी कायटे. यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. प्रविणजी मुंढे तसेच पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. भरतजी काकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा नोंदवून कामकाज सुरु केलेले आहे. परंतु या प्रकरणात दिलेल्या फिर्यादीनुसार एक महिला व पाच आरोपी समोर आले असल्याने व अजून काही आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने या पिडीत मुलीच्या उदरात वाढून जन्माला आलेल्या मुलीचा खरा बाप कोण असा प्रश्न जनतेतून चर्चला जात असून पिंपळगाव पोलिसांपूढे हे एक मोठे आव्हान ठरणार आहे.
(सदरील तरुणीवर झालेल्या अत्याचारात ती गरोदर राहिल्याची बाब ही चार महिन्याअगोदरच निदर्शनास आली होती परंतु मध्यस्थी महिलेच्या मदतीने पिडीतेवर सतत दबाव टाकून जीवे मारण्याची धमकी देत संबंधित आरोपींना पाठीशी घालण्यासाठी एका सफेदपोश अंगावर घालुन पिंपळगाव हरेश्वर गावात पुढारपण करणाऱ्या एका प्रतिष्ठित व्यक्तीने या बाळाची विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न केला मात्र तो असफल झाला व यातच निसर्गचक्र सुरु राहिले व यातूनच या पिडीतेवर ही माता होण्याची वेळ आली असल्याचे जनतेतून चर्चीले जात असून या प्रकरणात आरोपींना वाचवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचीही चौकशी होऊन या दलालांसह आरोपींना कठोर शासन व्हावे अशी मागणी पंचक्रोशीतील जनतेतून होत आहे. )
आता या प्रकरणी डीएनए चाचणी होणार असल्याची चर्चा असल्याने या अहवालाकडे सगळ्यांच लक्ष लागले आहे.