डीजीटल मिडियाच्या युगात प्रिंटींग प्रेसचा व्यवसाय डबघाईला.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०१/२०२१
सद्या सगळीकडे ग्रामपंचायतीच्या निवडणूकांची धामधूम असून त्यातच लग्नसराई, वाढदिवस व ईतर कार्यक्रमांची रेलचेल असल्यावरही दुसरीकडे याच कार्यक्रमांवर अवलंबून असलेला प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय डबघाईला गेलेला दिसून येत असल्याने प्रिंटिंग प्रेससाठी लागणारे प्रिंटर, संगणक, प्लेट मशीन, डबल कलर मशीन, सिंगल कलर मशीन, कटर ही लाखो रुपये किंमतीची यंत्रसामुग्री धूळखात पडून असल्याने प्रिंटिंग प्रेस उभारणीसाठी लागणारी इमारत, इमारत भाडे लाईट बिल व कामगारांना पगार देणे मुश्कील झाले असून हा डोलारा उभा करण्यासाठी घेतलेले कर्ज फेडणे मुश्कील झाले असल्याने प्रिंटिंग प्रेस व्यवसाईकांवर व कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
यामागचे मुख्य कारण म्हणजे मोबाईल (भ्रमणध्वनी) व संगणकाचा वापर वाढल्याने व पेपरलेस व्यवहार होत असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.
अगोदरच्या काळात कोणतीही निवडणूक असली म्हणजे प्रचार पत्रिका, जाहीरनामा, मतपत्रिका नमुना, बिल्ले तसेच निवडून आल्यानंतर आभार पत्र दैनंदिन जिवनात लग्न पत्रिका, जाऊळ, नामकरण सोहळा, नवसाची निमंत्रण पत्रिका, शोकसंदेश तसेच दैनंदिन व्यवहारात कापड दुकान, किराणा दुकाण, हार्डवेअर, पेट्रोलपंप व इतर व्यवसायात छापील कागदी बिलांचा वापर व्हायचा तो आता गुगल पे, फोन पे, ऑनलाईन मनी ट्रान्सफर तसेच संगणकीय बिलाव्दारे होत असल्याने बीलबुक छपाई बंद झाली आहे.
शाळा, कॉलेज, अंगणवाडी, दवाखाने, रेशन दुकानात ऑनलाईन व संगणकाचा वापर केला जातोय
तसेच ग्रामपंचायत पासून तर सर्व शासकीय कार्यालयात संगणकीय व्यवहार सुरु झाल्यामुळे पेपरलेस व्यवहार प्रणालीचा वापर होत असल्याने लागणाऱ्या छापील टेशनरीचा वापर होत नसल्याने प्रिंटर प्रेस व्यवसाय ठप्प झाल्यासारखा असल्याची परिस्थिती दिसून येत आहे.
कुठलेही निमंत्रण, आमंत्रण, सार्वजनिक कार्यक्रम, विवाह सोहळा, दुखद निधन, मोर्चाचे आयोजन, मेळावे, सामाजिक, सांस्कृतीक कार्यक्रमांची माहिती, निवडणूकीत उमेदवाराचा परिचय, जाहीरनामा, निशाणी ही माहिती काही क्षणातच व कमी खर्चात भ्रमणध्वनीद्वारे फेसबुक तसेच व्हाट्सएपच्या माध्यमातून संदेश पाठवून कळविले जात असल्याने प्रिंटिंग प्रेस व्यवसाय डबघाईस आला आहे. भविष्यात आमच्यावर उपासमारीची आली आहे अशी माहिती वरखेडी येथील चौधरी प्रिंटिंग प्रेसचे संचालक स्वप्नील चौधरी यांनी दिली आहे.