गावातील डुक्करे धरुन न्या व बक्षीस मिळवा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/१२/२०२०
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव गावात गावठी डुकरांची संख्या मोठ्याप्रमाणात असून ही डुक्करे दिवसरात्र गावात फिरत असतात.
ही गावठी डुकरे गावातील घरांमध्ये घुसून घरातील धनधान्याची नासाडी करतात. तसेच अंगणात ठेवलेला चारा, गुरांना ठेवलेली ढेप खाऊन फस्त करतात. मागील आठवड्यात या डुकरांनी थेट श्री. अंबिका देवीच्या मंदिरात धुडगूस घातला होता. तसेच गावात लहान मुलांना अंगणात खेळणे किंवा दुकानातून काही वस्तू आणने मुश्कील झाले आहे. कारण ही डुकरे अंगावर धाऊन येतात व चावा घेतात.
तसेच गाव हागणदारीमुक्तीकडे वाटचाल करीत असून या डुकरांना खाद्य मिळत नसल्याने ही पिसाळल्यासारखी करता. जिवंत कुत्र्याला मारुन खातात म्हणून यांना रक्ताची चटक लागली असल्याने ते लहान मुलांना चावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच रात्री बे रात्री महिला, पुरुषांना घराबाहेर पडायचे असल्यास हातात काठी घेतल्याशिवाय बाहेर निघताय येत नाही.
या गावठी डुकरांचा बंदोबस्त व्हावा म्हणून ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित डुकरांच्या मालकाला बोलावून सांगितले तरीही तो ऐकून घेत नसल्याने पिंपळगाव हरेश्रर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी त्याला वारंवार सूचना दिल्या तरीही या डुकरांचा मालक आंबादास जाधव (शेंदुर्णी) हा कुणालाही जुमानत नाही. उलट डुकरांचा बंदोबस्तासाठी ज्यांनी अर्जफाटे केले त्यांना दमदाटी करतो.
तरी आता या डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी या डुकरांना धरुन नेण्यासाठी जाहीर आवाहन करण्यात येत असून जो कुणी इच्छुक असेल त्यांनी अंबे वडगाव येथे ग्रामपंचायतीला संपर्क करून डुकरांना धरून न्यावे असे जाहीर कले आहे.
तसेच जो कुणी डुकरांना घेऊन जाईल त्याला दिलीप जैन. यांचेकडून योग्य बक्षीस देण्यात येईल.
तरी इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा.