कजगाव येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा आमदार रोहित पवारांच्या हस्ते शुभारंभ.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०१/२०२१
आमदार रोहित पवार यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्याची सुरुवात कजगाव येथुन झाली प्रसंगी कजगाव येथे डॉ.भुषण मगर यांच्या विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उदघाटन आ.पवार यांचे हस्ते करण्यात आले प्रसंगी जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते कजगाव येथे आगमन प्रसंगी कजगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे दि.२४ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे औरंगाबाद येथुन कजगाव येथे आगमन होताच कजगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी जि. प.सदस्य मंगेश पाटील व कार्यकर्त्यांनी आ.पवार यांचा सत्कार केला या नंतर डॉ.भुषण मगर यांच्या विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे उदघाटन आ.पवार यांचे हस्ते करण्यात आले प्रसंगी डॉ.भुषण मगर,डॉ.सागर गरुड,उद्योजक नितीन
धाडीवाल व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या नंतर आयोजित सभेत त्यांनी पाचोरा येथे विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉ.मगर,डॉ.गरुड सह त्यांचे सहकारी डॉक्टर देत असलेल्या सेवे बद्दल कौतुक केले प्रसंगी आ.पवार म्हणाले की समाजकारणा मध्ये आल्यानंतर तुमच्यासारख्या चे प्रेम पवार साहेब,दादा व माझ्या कुटूंबावर असेल त्याचेच काहि प्रमाचे शिंतोडे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर तुमच्यासारख्या माध्यमातून पडत असेल तर प्रत्येक प्रेमाचा थेंब तो माझ्या कडे जपुन ठेवेल त्याचा शेवटपर्यंत त्या प्रेमाचे मान ठेवत मला जेवढे करता येईल तेवढे मी करेन असे आश्वासन प्रसंगी दिले.