पारोळा तालुक्यातील तमाशा कलावंतांना राजवड येथे शिधा वाटप.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०५/२०२१
अखिल भारतीय शाहिर संघटनेचे सदस्य शेषराव गोकुळ,धुळे, अखिल भारतीय नाट्यमंडळाचे सदस्य विनोद ढगे,जळगांव,संदिप घोरपडे सर,अमळनेर यांनी कोरोना काळातील लाॅकडाऊनमुळे संपुर्ण तमाशा कलावंताना उपासमारीची झळ मोठ्या प्रमाणात पोहचू नये याकरीता जळगांव जिल्हयातील विविध समाजसेवी संघटना व दानशुर व्यक्तींना तमाशातील कलावंतांना मदत करण्याचे आवाहन करीत आहेत. त्यांच्या भावनिक आवाहनास कांताई जैन फाउंडेशन तसेच जैन उद्योगसमुहाचे चेअरमन अशोकजी जैन यांनी प्रतिसाद देत पारोळा तालुक्यातील तमाशा कलावंतांना शिधावाटप केला.
सदर शिधा वाटपाचा छोटेखानी कार्यक्रम पारोळा तालुक्यातील मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या सहकार्याने राजवड (आदर्शगाव) या ठिकाणी संपन्न झाला. मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी राजवड गावी येणा-या कलांतांसाठी वेफर,मुरमुरे पाकीट,कोल्ड्रींकस व पाण्याची व्यवस्था करुन दिली त्याचप्रमाणे सर्व कलावंतांना प्रवासभत्ता म्हणून १००रु.प्रतिव्यक्ती मदत देखील केली.
संदीप घोरपडे सर,विनोद ढगे व शेषराव गोपाळ यानी कोरोनाचा तमाशावर व तमासगीरांवर होणारे गंभीर परीणाम यांच्याविषयी आपले भावनिक विचार मांडलेत.
संदीप घोरपडे सरांनी राजवड गावात पुर्वी यात्रा व तमाशे यांचा उत्साह असायचा पण काही कारणास्तव राजवड गावात यात्रा व तमाशे बंद करण्यात आलेत.तमासगीरांना राजवडकर विशेष सन्मान व स्नेह पुर्वक वागणूक देऊन जणुकाही राजाश्रयच द्यायचे.कोरोनाचा वाईट काळ संपल्यावर राजवड गावात परत तमाशे सुरु करुन तमासगीरांवरील राजाश्रयाचे छत्र पुन्हा उभारावे अशी भावनिक साकडे मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांना ग्रामस्थांच्यावतीने घालण्यात आले. अमळनेर हे खान्देशातील तमासगीरांचे केंद्र असुन तेथेही मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी जागा उपलब्ध करुन दिल्यास लवकरात लवकर विद्यमान आमदार अनिलदादा पाटील यांच्या मार्फत तमासगीरांचे हक्काचे कायमस्वरुपी केंद्रीय कार्यालय व विश्रामगृहाची निर्मिती करण्याचे सुतोवाच संदीप घोरपडे सरांनी केले…
सदर शिधा वाटप कार्यक्रमास राजवड (आदर्शगांवाचे) सरपंच दादासो हरी नामदेव पाटील,संदीप घोरपडे सर,विनोद ढगे,शेषराव गोपाळ ,निशिकांत पाटील,प्रशांत निकम,लोटन देसले,गणेश पाटील,दत्तु पाटील,राजु पाटील(राजु वस्ताद),अशोक परदेशी,अमोल पाटील(पप्पु दादा),ज्ञानेश्वर पाटील सर,पवन पाटील,राजु पाटील(शिपाई),भास्कर पाटील,पारोळा तालुक्यातील तमाशा कलावंत ताईसो सुनंदा कोचुरे व कल्पना कोचुरे सह ३५ कलावंत उपस्थित होते…..
सर्व तमासगीर कलावंतांनी कोरोना काळात शिधा वाटप करुन मदतीचा हात दिल्याबद्दल जैन उद्योग समुहाचे चेअरमन अशोक जैन,मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील,लोकनियुक्त नगराध्यक्षा ताईसो जिजामाता कृषिभूषण पुष्पलता साहेबराव पाटील,संदीप घोरपडेसर,विनोद ढगे,शेषराव गोपाळव राजवड ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले…