मकर संक्रांत साजरी करण्याचं कारण जाणून घ्याचं

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०१/२०२१
तिळगुळ घ्या व गोडगोड बोला
भारतीय संस्कृती ही जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. परंतु आपण काही अपवादात्मक कारणास्तव आपल्याच संस्कृतीला नाव ठेवत विसरून जात असल्याचे जाणवते
म्हणून भारतीय संस्कृतीत मकरसंक्रांत का साजरा करतात याबद्दल संग्रहीत माहिती आपल्यासमोर ठेवत
सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्याने या दिवशी ‘मकर संक्रांती’ असे म्हणतात. आपल्या हिंदू महिन्यानुसार, मकर संक्रांती उत्सव पौष शुक्ल पक्षामध्ये साजरा केला जातो.
प्रत्येक सणाला काही ना काही ऐतिहासिक महत्व असतेच. त्यातीलच महाराष्ट्रातील मकर संक्रांत हा एक सण. मकर महिन्यात कृष्णा पंचमीवर देशातील राज्यांमध्ये मकर संक्रांती वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा मकर संक्रांती साजरी करत असालच बरोबर ना. परंतु तुम्हाला हे माहित आहे का? याला मकर संक्रांती का म्हणतात? आणि ती का साजरी केली जाते? चला तर मग तेच जाणून घेऊ या.
मकर संक्रांतीमधील ‘मकर’ हा शब्द मकरराशीला संबंधित आहे. तर ‘संक्रांती’ याचा अर्थ संक्रमण आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीपासून मकर राशीत प्रवेश करतो. एक राशीला सोडून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असल्यामुळे त्यास संक्रांती असे म्हणतात. सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्याने या दिवशी ‘मकर संक्रांती’ असे म्हणतात. आपल्या हिंदू महिन्यानुसार, मकर संक्रांती उत्सव पौष शुक्ल पक्षामध्ये साजरा केला जातो.
महाराष्ट्रातील मकर संक्रांत
महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांत हा सण तीन दिवस साजरा केला जातो. यामध्ये पहिल्या दिवशी भोगी, दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते . संक्रांतीच्या या दिवसात आपल्या मित्र मैत्रिणींना, नातेवाईकांना आणि लहान मुलांना तिळगूळ वाटतात. तसेच स्त्रिया या दिवशी ‘तिळगूळ घ्या आणि गोड बोला’ असे सांगून हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करतात. व काहीतरी भेटवस्तू एकमेकांना भेट म्हणून देतात. संक्रांतीपासून रथसप्तमी हा हळदीकुंकवाचा शेवटचा दिवस असतो. या दिवसात मराठी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात.
संक्रांतीमध्ये आहाराला खूप महत्त्व
मकर संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. या दिवसात थंडीला सुरवात होते. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खाल्ली जाते. तसेच बाजरीची भाकरी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाणे, पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात केला जातो.
मकर संक्रांत आणि तिळाचे महत्व काय?
भारतीय संस्कृतीत मकर संक्रांतीला महत्व आहे. मकर संक्रांतीत तिळाला जास्त महत्व असते. संक्रांतीमध्ये तीळ आणि गूळ खाण्याला प्राधान्य दिले जाते. या तिळाला का महत्व आलेय, हे तुम्हाला माहित आहे का?
मकर संक्रांत आणि तिळाचे महत्व
मकर संक्रांतीत तिळाला जास्त महत्व असते. संक्रांतीमध्ये तीळ आणि गूळ खाण्याला प्राधान्य दिले जाते. या तिळाला का महत्व आलेय, हे तुम्हाला माहित आहे का?
काळे तीळ आणि पांढरे तीळ असे दोन
थंड वातावरणापासून शरीराचे रक्षण व्हावे यासाठी तीळ-गूळ खाल्ले जातात. तीळ हा आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त पदार्थ आहे. काळे तीळ आणि पांढरे तीळ असे दोन प्रकार असतात. तीळ उष्ण असल्याने थंडीमध्ये शरीरातील उष्णता प्राप्त करुन देतात. त्यामुळे थंडीत तिळ खाण्याला प्राधान्य द्यावे.
अर्धा चमचा तीळ खाऊन त्यावर कोमट पाणी प्या. थंडीचा त्रास कमी होतो आणि शरीरातील उष्णता कायम राहण्यास मदत होते.
तीळ खाण्यामुळे त्वचा मुलायम राहते. तिळात तेल असल्याने त्वचेची कांती सुधारते. त्वचा कोरडी पडत नाही.
बाळंत स्त्रीला पुरेसे दूध येत नसेल तर तिला दूधात तीळ घालून ते प्यायला द्यावे. याचा चांगला उपयोग होतो.
ज्यांना लघवी स्वच्छ होत नाही त्यांनीही तीळ, दूध आणि खडीसाखर खाल्ल्यास मूत्राशय मोकळे होण्यास मदत होते.
दातांच्या बळकटीसाठी आणि स्वच्छतेसाठीही तिळाचा चांगला उपयोग होतो.
केसांची वाढ चांगला व्हावी यासाठी तिळाचे तेल केसांना लावणे चांगले
थंडीच्यावेळी लसूण, खोबरे घालून केलेली तिळाची चटणी खाणे चांगले. ज्या महिलांना पाळीत कमी रक्तस्त्राव होतो त्यांनी ही चटणी खाल्ल्यास फायदा होतो.
मधुमेह आहे अशांनी संक्रांतीच्या काळात तीळगुळ खाण्यावर नियंत्रण ठेवावे.
तीळ पचायला जड असल्याने थंडीमध्ये भूक शमवण्यासाठी भाकरीला तीळ लावून खाण्याची पद्धत आहे.
आपण भाजीला शेंगदाण्याचा कूट घालतो त्याऐवजी थंडीमध्ये तिळाच्या कूटचा वापर केल्यास लाभदायक असतो. यामुळे भाजीला चव येते.
तिळगुळ देऊन स्नेह वाढवला जातो
या दिवशी तिळगुळ देऊन स्नेह वाढवला जातो. नवीन नाती जोडली जातात. जुने असलेले नाती समृद्ध केली जातात. त्यामुळे जुने राग, द्वेष आणि वाद विसरून नव्याने नात्याची सुरवात केली जाते.
हा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सण
मकर संक्रांतीपासून वसंत ऋतुला सुरुवात होऊन बीजांना अंकुर फुटतात. तसेच खरीप पिकांची कापणी झालेली असते आणि रबी पिकांची पेरणी सुरु होते. यामुळे शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा सण असतो.
संग्रहीत माहिती आपल्यासमोर सादर करत आमच्या सर्व वाचक, शुभचिंतकांना मकरसंक्रांतीच्या व नववर्षाच्या खूप खूप हार्दीक शुभेच्छा
तिळगुळ घ्या व गोडगोड बोला
सत्यजीत न्यूज
अंबे वडगाव ता.पाचोरा जि.जळगाव
बातम्या व जाहिराती साठी संपर्क
९९७५६६६५२१/७७१९०३४५२१