लोहारा येथील रामराज्य फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष कोळी यांनी केली डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर प्रवेशद्वाराची सिमेंट प्लास्टर सहित डागडूगी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०१/२०२१
पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील रामराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष व संघाचे स्वयंसेवक यांनी लोहारा येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर ह्या प्रवेशद्वाराची केली सिमेंट प्लास्टर सहित डागडूगी त्यात विशेष म्हणजे आजच्या दिवशी ८ जानेवारीला बौद्ध धम्मध्वज दिन होता ह्या शुभमुहूर्तावर ह्या प्रवेशद्वाराला सुशोभित करून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठीचा हा नवीन उपक्रम रामराज्य फाउंडेशनने गावात राबविला जेणेकरून गावातील प्रत्येक व्यक्तीला हा आदर्श निर्माण होईल व आजच्या बौद्ध धम्मध्वज दिनाची आठवण ह्या अर्थी करून सर्व नागरिकांना होईल आशा सामाजिक भावनेतून हा स्तुत्य उपक्रम हाती घेवून आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.आणि पहिल्यापासूनच रामराज्य फाउंडेशनचे स्वयंसेवक आशा सामाजिक कार्यातून समाजासमोर येत असतात कधी आदीवासी असलेल्या भिल्ल समजला दिवाळी फराळ वाटप तर कधी रक्तदान शिबिर घेवून, तर कधी श्री राम नवमी शोभायात्रा काढून तर कधी महापुरुषांचे जयंती किंवा पुण्यतिथी चे कार्यक्रम घेवून समाजात सामाजिक कार्य करत राहणे हा उद्देश असतो तरी काही ठराविक समाजातील व राजकीय क्षेत्रातील विरोधी लोकांकडे लक्ष न,देता ही मुल त्यांना जितके झेपावेल तसे सामाजिक कार्य करून देव देश धर्म संस्कृती रक्षणासाठी सदैव कार्यरत राहून आपली समाजाची एक नैतिक जबाबदारी पार पाडण्यासाठीचा प्रयत्न करीत असतात तर ह्या वेळी सहकार्य करण्यासाठी पुढे सरसावले रामराज्य फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष कोळी,गजानन भोसांडे,राम चौधरी,सागर कोळी,श्रावण भोसांडे,समाधान कोळी,सतिष राजपूत,विशाल राजपूत,गोपाल कोळी यांचे उत्तम प्रकारे सहकार्य लाभले अशी माहिती संतोष कोळी यांनी दिली.