ग्रामपंचायत निवडणुक अडथळ्यांच्या शर्तीमूळे इच्छुकांचा जीव दिवसभर टागणीला. उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी एकच झूंबड .
कदीर पटेल(सिल्लोड तालुका प्रतिनिधी)
दिनांक~३१/१२/२०२०
सिल्लोड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकी साठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकच झूंबड उडाली होती. सर्व्हर डाऊन इंटरनेटची स्पीड कमी आदी आळथल्याची शर्यत एकीकडे संपता संपत नसतांना दूसरीकडे अर्ज दाखल करण्याची अंतीम वेळ जवळ येत चालल्याने इच्छुकांचा जीव टागणीला लागला होता. वेळ वाढवून देण्यासह ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारण्यात आल्यामुळे कोंडी फूटण्यास मदत झाली दरम्यान जिल्हातील अनेक ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. बुधवारी शेवटच्या दिवस आसल्याने.
( नामांकन पत्र)
अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची झूंबड उडून अर्ज स्वीकूती ठिकाणच्या परिसराला यात्रेचे स्वरूप आले.होते .विविध गावाचे भावी संदस्य व त्याचे समर्थक घोळक्याने बसलेले होते. भविष्यातील निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी गावचे भावी सदस्य सरपंच व उपसंरपंच आपल्या सहकार्यासोबत मग्न असल्याचे चित्र पाहाला मिळाले.
(सिल्लोड तालुक्यातील १०४२ अर्ज)
सिल्लोड तालुक्यातील मूदत संपलेल्या ८३ ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी ( दिनांक ३०) तब्बल १ हजार ४१ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दूसर्या दिवशी गुरूवारी १९ .सहाव्या दिवशी सोमवारी ३२७ तर सातच्या दिवशी मंगळवारी ९९७ तर शेवटच्या सर्वधिक १ हजार ४१ असे एकून २ हजार ३८४ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. अशी माहिती तहसीलदार विक्रम राजपूत यांनी दिली. शेवटच्या दिवसापर्यंत गावागावांतील नेत्यानी पॅनलची जुळवाजुळवी सूरू होती. १५ जानेवारीला होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये तालुक्यातील या गावाचे समावेश आहे. अंधारी, आमसरी, अजिठा, उडणगाव, खूपटा, डोंगरगाव, चादापूर, शिवना, गव्हाली, ताडा. चिंचखेडा, अंभई, भराडी, केर्हाळा, पळशी, चिचपूर, तलवाडा, टाकळी जीवरंग, दहीगाव, अन्वी, बोरगांव सारवाणी,डिग्रस, आमठाणा, पिंपगाव घाट, पागरी, पिपप्रि, पेडगाव, गोळेगाव बूर्द, बहूली, देऊळगावबाजार, बाळापूर, माडणा,लिहाखेडी, पानवडोद बूर्द, लोणवाडीकर, मूकपाड, म्हसला खूर्द, मादणी, वडाला, वागी बूर्द, भायगाव, बडोदचाथा, घाटनांद्रा,आदी ८३ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. रात्री ८ वाजे पर्यंत स्वीकारले अर्ज अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेत सलग तीन दिवस सूट्या आल्या त्यात अर्ज ऑनलाईनचे संकेतस्थळ बंद पडले संथ गतीणे चालने अशा अनेक अडचणीना तोड द्दावे लागले यामुळे शेवटच्या दिवशी दूपारी ३ ऐवजी ५:३० वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्यात आल्याने रात्री ८ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होती. शेवटच्या दिवशी इच्छुकांनी मोठी गर्दी केल्याने औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.