वैशाली राठोड.(पाचोरा)
दिनांक~१०/०१/२०२४

पाचोरा व भडगाव तालुक्यात उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्याकडे कोणतीही सत्ता नसतांना स्व. तात्यासाहेब आर. ओ. पाटील. यांचा जनसेवेचा वसा हाती घेत गाव, वाडा, वस्त्यांवर जाऊन गोरगरीब, पिडीत जनतेच्या भेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेत त्यांना योग्य ती मदत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत व मदत करत आहेत. याच त्यांच्या कार्याची दखल घेत गाव, वाडा, वस्त्यांवरील सर्वसामान्य जनतेच्या मनात सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्याबद्दल आपुलकीची भावना निर्माण झाली असल्याकारणाने बरेचसे लोक यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने त्यांच्या सोबत उभे राहिले असून भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत आमदार म्हणून सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांना निवडून दिल्यास नक्कीच पाचोरा व भडगाव तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

म्हणून गाव, खेड्यापाड्यातील वाडावस्तींवरील लोक उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांना भेटून उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेमध्ये प्रवेश घेत आहेत. याचाच एक भाग म्हणून गाव तेथे शाखा हा उपक्रम हाती घेत शिवसेना पक्षप्रमुख हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या अर्धांगिनी मायेची सावली देणाऱ्या शिवसेनेच्या माऊली आदरणीय मॉ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या ममता दिनाचे औचित्य साधून काल दिनांक ०८ जानेवारी २०२४ मंगळवार रोजी सकाळी ढोल, ताशांच्या गजरात सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते व शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख मा. श्री. अरुण भाऊ पाटील, उपजिल्हाप्रमुख मा. श्री. उध्दव भाऊ मराठे, राजु काळे, ज्ञानेश्वर चौधरी, संतोष पाटील, मिलिंद भुसारे, पितांबर सपकाळे, ॲड. मंगेश गायकवाड, संजय पाटील, हेमराज राठोड, उत्तम राठोड, चरण राठोड, उपजिल्हा युवाधिकारी संदिप जैन, गफ्फार भाई, अभिषेक खंडेलवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत जोगे वडगाव, कोकडी तांडा, लासूरे, सावखेडा बुद्रुक तसेच सायंकाळी मोठ्या लोकसंख्येचे असलेले पिंपळगाव हरेश्वर या ठिकाणी शाखांचे उद्घाटन करण्यात आले.

या शाखा उद्घाटन प्रसंगी स्थानिक शाखाप्रमुख, उपशाखा प्रमुख बुथ प्रमुख, शाखा संघटक, विभागप्रमुख, सोशल मीडिया प्रमुख बी. एल. ओ. सह शिवसैनिक व उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेत नव्यानेच प्रवेश घेणाऱ्या नवयुवक व जेष्ठ नागरिकांना शिवसेनेचा रुमाल गळ्यात घालून सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.