राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नाबाबत इच्छा मरणास परवानगी दयावी यशवंत पवार यांनी राज्यपाल यांच्याकडे केली मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/१२/२०२०
राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नाबाबत इच्छा मरणास परवानगी दयावी अशी मागणी यशवंत पवार यांनी राज्यपाल यांच्याकडे केली मागणी.
याबाबत सविस्तर वृत्त असे की
सोलापूर -पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून
*पत्रकार संरक्षण कायदा*
*पत्रकारांसाठी विमा योजना*
*राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी*
*यादीवर नसलेल्या वृत्तपत्र ना शासकीय जाहिराती मिळणे*
*पक्की व स्वतः च्या मालकीचे घरे नसलेल्या पत्रकारांसाठी घरकुल योजना*
*अल्प मानधनावर काम करणाऱ्या ग्रामीण व शहरी भागातील असा भेदभाव न करता केंद्र सरकार व राज्य सरकार च्या योजनेचा लाभ मिळणे*
*पत्रकारांवरील हल्ले बाबत जलद गती न्यायालयात खटले चालवणे*
*कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या कुटूंबियांना तात्काळ पन्नास लाख रुपये मदत करणे*
यासह पत्रकारांच्या विविध प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून राज्यसरकार ला जाग आणण्यासाठी अनेक वेळा आंदोलन उपोषण निवेदन व वारंवार पत्रव्यवहार करून देखील राज्य सरकार ने पत्रकारांचे प्रश्न सोडवले नाहीत
*मूठभर पत्रकारांना खूष करण्यासाठी शेकडो पत्रकारांना राज्य सरकार ने वाऱ्यावर सोडल्याचा गंभीर आरोप प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी केला असून*
राज्य सरकार ला पत्रकारांच्या प्रश्नाचा विसर पडल्याने मी जगून उपयोग तरी काय? असा प्रश्न हताश व निराश होऊन राज्य सरकार ला विचारला आहे
*सहा जानेवारी पत्रकार दिनी मला इच्छा मरणाची परवानगी द्या अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी राज्याचे राज्यपाल यांना पत्राद्वारे केली आहे*
सदरचे निवेदन सोलापूर चे जिल्हाधिकारी यांना दिले आहे
यावेळी वैजिनाथ बिराजदार अक्षय बबलाद अरुण सिदगिड्डी, इस्माईल शेख इत्यादी पत्रकार उपस्थित होते.