कोरोना काळात जामनेर तालुक्यात हॉटस्पॉट ठरलेल्या पाळधीत प्रथमिक आरोग्य केंद्र व्हावे-जामनेर युवासेनेची मागणी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०५/२०२१
जामनेर तालुक्यातील पाळधी हे गाव जळगाव औरंगाबाद हायवेवर असून लोकसंख्येच्या दृष्ट्या मोठे असुन पंचक्रोशीतील गोंडखेल, माळपिंप्री,देवपिंप्री,सुनसगाव,सवतखेडा,मोरगाव,रोटवद,नांद्रा प्र.लो.,नाचणखेडा,सार्वे, भिलखेडा, भराडी, सोनाळा, पिंपळगाव गोलाईत,खर्चाणे हि गावे लागुन आहेत. यागावांचे केंद्रबिंदु पाळधी असल्याने पाळधी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र झाल्यास या गावांना आरोग्यविषयक सोईसुविधा पोहचवण्यासाठी मदत होईल.त्याच प्रमाणे पाळधी गावावरुन जाणाऱ्या महामार्गावर अपघाताचे प्रमाण देखील असल्याने सरकारी उपाययोजना देखील तोकड्या पडतात तर रुग्णाला जळगाव हलविण्यासाठी रुग्णवाहिका देखील वेळेवर उपलब्ध होत नाही.
पाळधी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र होणे गरजेचे असल्याने जामनेर तालुका युवासेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन मागणी करीत निवेदन देण्यात आले आहे.
याप्रसंगी युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी विश्वजितराजे मनोहर पाटील,शिवसेना जामनेर शहर प्रमुख अतुल सोनवणे,माजी युवा उपजिल्हाप्रमुख ॲड.भरत पवार,युवा तालुका प्रसिद्धी प्रमुख मुकेश जाधव, शहर उपप्रमुख सुरेश चव्हाण,ईश्वर चोरडीया हे उपस्थित होते.