शिवसेना नेते तथा पत्रकार गणेश पांढरे यांची शिवसेना जामनेर तालुका प्रवक्ते पदी निवड.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/१२/२०२०
जामनेर तालुक्यातील पहूर येथील विद्यमान शिवसेना विभाग प्रमुख तथा पत्रकार गणेश पांढरे यांची जामनेर विधानसभा शिवसेना प्रवक्ता पदी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे राज्यसभा खासदार दैनिक सामना संपादक तथा प्रवक्ता संजय राऊत साहेब जिल्हा संपर्क नेते विलासजी पारकर यांच्या आदेशाने जामनेर तालुक्यातील नवनिर्वाचित पदाधिकारी जाहीर करण्यात आले यात पहूर येथील गेल्या 35 वर्षापासून शिवसेनेची कमान सांभाळणारे निष्ठावंत शिवसैनिक तथा शिवसेना विभाग प्रमुख व दैनिक सामना’चे तालुका प्रतिनिधी गणेश पांढरे यांची शिवसेना तालुका प्रवक्ता पदी निवड करण्यात आली आहे त्यांचे अभिनंदन शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील सुकलाल शेट बारी युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील एडवोकेट भरत पवार आदी पदाधिकारी अभिनंदन केले आहे.