आधार हरवल्यामुळे निराधार झालेला कुऱ्हाड येथील दौलत धनजी गोंधळी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०२/२०२२
कुऱ्हाड येथील अल्पभूधारक शेतकरी दौलत धनजी गोंधळी
टी. एन. शेषन यांनी निवडणूकीत मतदानासाठी तसेच इतर कामासाठी संबंधित व्यक्तीची ओळख पटवून देण्यासाठी एक ओळखपत्र आमलात आणले होते त्या कार्डचे शेषन कार्ड ओळख म्हणून अमलात आणले होते. केंद्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर आपले आदरणीय पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांनी भारतीय नागरिकांना आधारकार्ड देऊन नवीन ओळखपत्र बनवून दिले हे देण्यामागचे कारण हेच की संबंधित व्यक्तीला दैनंदिन व्यवहारात ठिकठिकाणी याचा फायदा होऊन व्यवहार सुरळीत होऊन वेगवेगळ्या योजनांचा फायदा घेतांना इतर कागदपत्रांची जमवाजमव करावी लागणार नाही. आणि तेव्हापासून आधारकार्ड हे जीवनाचे अविभाज्य घटक झाले आहे.
आधार हरवल्यामुळे निराधार झालेला कुऱ्हाड येथील दौलत धनजी गोंधळी. हातो की चंद लकीरों का, सब खेल है है बस तकदीरो का, तक़दीर है क्या मैं क्या जानू, आशिक हु तदबीरो का.
पीएम किसान योजना काय आहे?
पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
दर 4 महिन्यांच्या अंतरानं 2 हजार रुपयांचा हप्ता, अशापद्धतीनं 3 हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.
साधारणपणे, दरवर्षी एप्रिल महिन्यात पहिला, ऑगस्टमध्ये दुसरा तर डिसेंबरमध्ये तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो.