कुऱ्हाड गावात कापूस व्यापाऱ्यांकडून मापात पाप, लबाड लांडग्यांचे वजन काटे ग्रामस्थांनी घेतले ताब्यात.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०२/२०२३

सद्यस्थितीत कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग भविष्यात भाव वाढतील या आशेवर बसून आहे. तरी पण दैनंदिन व्यवहारासाठी थोड्याफार प्रमाणात कापूस विकणे गरजेचे असल्याने कापूस उत्पादक शेतकरी गावात असलेल्या व बाहेरगावाहून आलेल्या लहान मोठ्या व्यापाऱ्यांना कापूस विकत आहे. परंतु हा कापूस विकत घेतांना व्यापारी वर्गाकडून मातीमोल भावात खरेदी सुरू असून आधीच शेतकरी मारला जात असतांनाही पुन्हा काही भामटे, लबाड व्यापाऱ्यांनी शासनमान्य नसलेल्या ताण वजन काट्यात हेराफेरी करून व हेराफेरी करत प्रतिक्विंटल दहा ते पाच किलो कापूस जास्त मोजून घेत आहेत. असाच एक प्रकार आज रोजी पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड गावी घडला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की आज दिनांक ०८ फेब्रुवारी २०२३ बुधवार रोजी कुऱ्हाड येथील आठवडे बाजार असल्याकारणाने आठवडे बाजारात दैनंदिन वापरासाठी लागणारा किराणा, घर उपयोगी वस्तू व भाजीपाला घेणे गरजेचे असल्याने व हातात पैसा नसल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या घरात पडलेला कापूस विक्रीसाठी काढला असता याच मजबुरीचा फायदा घेत कुऱ्हाड गावातील काही व शिंदाड येथील कापूस व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदीला सुरुवात झाली होती.

गरजू शेतकऱ्यांनी कापूस मोजतांना कापूस व्यापारी ओळखीचे असल्याकारणाने सुरवातीला लक्ष दिले नाही. परंतु काही शेतकऱ्यांनी शेतातील आलेला कापूस आपल्या घरात कापूस मोजून साठवलेला होता. व्यापाऱ्यांना विकलेला कापूस व घरात आलेल्या कापसाचे वजन यात खुपच मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्यामुळे काही चाणाक्ष शेतकऱ्यांनी कापूस व्यापाऱ्यांच्या काट्यावर संशय व्यक्त करत विस किलो वजनाचे माप तानकाट्याला लावून वजन काट्याची बारकाईने तपासणी केली असता कमालीची तफावत आढळून आल्यामुळे त्यांनी त्या व्यापाऱ्यांना जाब विचारला असता त्या व्यापाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला याच वेळी आपला भांडाफोड झाला असल्याने संधी साधून शिंदाड येथील व्यापाऱ्यांने फळ काढला आहे.

तदनंतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी गावातील लोकमत वृत्तपत्राचे जेष्ठ पत्रकार मा. श्री. सुनील लोहार यांना बोलावून घडलेला प्रकार सांगितला असता सुनील लोहार यांनी शेतकऱ्यांना समजून सांगत कापूस व्यापाऱ्यांकडून त्याचे वजन काटे ताब्यात घेतले आहेत. आता कापूस उत्पादक शेतकरी हे संबंधित कापूस व्यापाऱ्याविरुध्द पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनला रितसर तक्रार दाखल करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

ब्रेकिंग
कुऱ्हाड व परिसरातील कापूस व्यापाऱ्यांनी अनधिकृत पणे व कोणताही परवाना नसलेल्या ताण काट्याने कापूस घेत असलेल्या चार व्यापाऱ्यांची काटे येथील पत्रकार सुनील लोहार यांनी ताब्यात घेतले आहेत. आज पर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या आज मात्र आज त्यांचा भांडाफोड झाला आहे.

सुनील लोहार ~

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी ताण काट्यावर कापूस विकत घेणाऱ्या कापूस व्यापाऱ्यांना कापूस विक्री करु नये असे सुचवले आहे.

ब्रेकिंग बातम्या