भोकरी ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंगमध्ये बोगस डॉक्टरांचा विषय गाजला.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०४/२०२४
आजच्या परिस्थितीत जळगाव जिल्ह्यात सर्वदूर बोगस डॉक्टरांनी धुमाकूळ घातला असून इलेक्ट्रोपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी औषधे वापरण्याची परवानगी नसतांनाही सर्वसामान्य जनतेच्या अज्ञानतेचा व गरजवंताला अक्कल थोडी अशा प्रसंगाला सामोरे जाणाऱ्या थोडक्यात सांगायचे झाले तर आजारापेक्षा उपचार बरे असे समजून मरणाला रात्र आडवी करणाऱ्या गरजू गोरगरिब रुग्णांवर हे बोगस डॉक्टर स्वताला एम. बी. बी. एस. असल्याचे समजून बिनधास्तपणे ॲलोपॅथी औषधांचा वापर करुन त्यांच्यावर उपचार करुन आरोग्याशी खेळ, खेळत आहेत. अशा या बोगस डॉक्टरांच्या विरोधात वारंवार आवाज उठवला गेला मात्र राजकीय हस्तक्षेप, जिल्हा व तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच स्थानिक नगरपालिका व ग्रामपंचायतीचे जबाबदार घटक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने या बोगस डॉक्टरांवर आजपर्यंत कुठेही ठोस कारवाई झाली नसल्याचे दिसून येते.
असे असले तरी मागील काळात काही जागरुक नागरिक, अधिकारी व कर्मचारी यांच्या सतर्कतेमुळे बोगस डॉक्टरांचा सर्व्हे करण्यात आला होता मात्र कोणतीही रितसर ठोस कारवाई करण्यात आली नसल्याने या बोगस डॉक्टरांची हिंमत वाढली आहे. परंतु आज मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या भोकरी ग्रामपंचायतीला पंचायत समितीकडून पत्र प्राप्त झाले असून या पत्रात भोकरी ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत गाव परिसरात कुठेही कोणीही बोगस डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय करत असेल तर त्याची शहानिशा करुन पंचायत समितीकडे अहवाल सादर करावा असे आदेश आले आहेत अशी माहिती समोर येत आहे.
हे पत्र प्राप्त होताच भोकरी ग्रामपंचायतीने आज दिनांक १५ एप्रिल २०२४ सोमवार रोजी घेतलेल्या मासिक मीटिंगमध्ये या पत्राबाबत खुलासा करुन पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे ग्रामविस्तार अधिकारी यांनी सांगितले तेव्हा भोकरी गावातील बोगस डॉक्टरांची पाठराखण करणारांनी ग्रामसेवकांना अहवाल सादर करु नये म्हणून सांगितले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. परंतु भोकरी गावात आजही दोन, दोन बोगस डॉक्टर हे मेडिकल कौन्सिलची कोणतीही परवानगी नसतांनाही दिवसाढवळ्या ॲलोपॅथी औषधांचा वापर करुन रुग्णांवर उपचार करुन रुग्णांच्या जिवाशी खेळ खेळत आहेत.
म्हणून ग्रामसेवकांनी कुणाच्याही दबावाला बळी न बोगस डॉक्टरांची माहिती पंचायत समितीकडे देऊन या बोगस डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यासाठी भाग पाडावे म्हणजे भविष्यात हे बोगस डॉक्टर रुग्णांच्या जिवाशी खेळ खेळणार नाहीत असे मत भोखरी गावातील ग्रामस्थांनी सत्यजित न्यूज कडे व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे भोकरी येथील बोगस डॉक्टर एका रुग्णाला सलाईन लावून ॲलोपॅथीची औषधे वापरुन उपचार करत असल्याची चित्रफीत व काही छायाचित्रे हाती लागली आहेत.