पाचोरा शहरात भाजीपाला तेजीत, शेतकऱ्यांनी जैविक शेती करावी.सुलतान बागवान.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/१२/२०२१
पाचोरा शहरासह तालुक्यात भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले असून सर्वसामान्य नागरिकांना भाजीपाला विकत घेणे आवाक्याबाहेर झाले आहे. या महागाईमुळे ग्राहक अगोदर अर्धा किलो भाजी घ्यामचे ते आता पाव किलोच भाजी घेऊन वेळ काढून नेत आहेत. तसेच भाजीपाला महाग झाल्यामुळे व्यापारी मात्र द्विधा मनस्थिती आपला व्यवसाय करत आहे. कारण शेतकऱ्याकडून व बाजारातून आणलेला महागडा भाजीपाला आणून तो विक्रीसाठी ठेवला असता महागाईमुळे ग्राहक कमी झाल्याने बराचसा भाजीपाला नासका होत असल्याने तो फेकून द्यावा लागत आहे.
आजमितीला वांगी १००/०० रुपये, टमाटर ४०/०० रुपये, फुलकोबी ६०/०० रुपये, भेंडी १००/०० रुपये, मटर ६०/०० रुपये, गड्डा कोबी ७०/०० ते ९०/०० रुपये, गाजर ३०/०० रुपये, सिमला मिरची ६०/०० रुपये, हिरवी मिरची ६०/०० रुपये प्रतिकिलो असे बाजारभाव आहेत.
भाजीपाला भाववाढीचे कारण म्हणजे निसर्गाचा लहरीपणा कधी जास्त पाऊस तर कधी कमी तसेच बेमोसमी पाऊस वातावरणात वारंवार होणारे बदल होत असल्याने भाजीपाला पिके घेणे खर्चिक झाले आहे. शेतकरी रात्रंदिवस मेहनत करुन निसर्गाचा सामना करत भाजीपाला पिकवण्यासाठी प्रयत्न करतो परंतु विद्यूत वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना वेळेवर विद्यूत पुरवठा मिळत नाही. कधी कमी दाबाने तर कधी वारंवार खंडित होणारा विद्यूत पुरवठा तसे रात्रीच्या वेळी विद्यूत पुरवठा केला जात असल्याने शेतकरी वैतागला आहे. त्यातच विद्यूत पुरवठ्यात वारंवार बिघाड होऊन कधी ट्रान्सफॉर्मर जळतो तर कधी कट आऊट बॉक्स जळतात. व याच्या दुरुस्तीसाठी विद्यूत वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. पैसे दिल्याशिवाय विद्यूत वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी काम करत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. या सगळ्या कारणांमुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले असून बाजारात भाजीपाला महाग झाला आहे.
शेतकऱ्यांनी जैविक शेती करावी.(सुलतान बागवान.)
वरील सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी व जास्त पैसा मिळवण्याच्या लोभाने सध्या शेतकरी जैविक शेती विसरला आहे. ४० दिवसात येणारा भाजीपाला तीस दिवसात पिकवण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या केमिकलच्या फवारण्या व केमिकल युक्त खते वापरून भाजीपाला पिकवत आहे. हा भाजीपाला आरोग्यासाठी घातक असल्याचे मत भाजीपाला विक्रेते (सुलतान बागवान) यांनी व्यक्त केले आहे.
रासायनिक पध्दतीने पिकवलेला भाजीपाला आहारात येत असल्याने वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. रासायनिक खते व वेगवेगळ्या केमिकलच्या फवारण्या करुन पिकवलेला भाजीपाला खाण्यात येत असल्याने माणसाचे आयुर्मान कमी होत असल्याचे सुलतान बागवान यांचे मत असून याचा लहान बालकांवर जास्त परिणाम होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. म्हणून शेतकऱ्यांनी पैशाच्या लोभापायी रासायनिक शेती न करता जैविक शेती करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.