संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त माजी पंचायत समितीचे माजी सदस्य ज्ञानेश्वर सोनार यांची अंबे वडगावला भेट.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०२/२०२३

काल दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ बुधवार रोजी सगळीकडे बंजारा समाजाचे संत श्री. सेवालाल महाराजांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने पाचोरा तालुक्यातील गाव, तांड्यावर संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त मिरवणूक, भजन, कीर्तनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यानिमित्ताने पंचायत समितीचे माजी सदस्य मा. श्री. ज्ञानेश्वर भाऊ सोनार यांनी पाचोरा तालुक्यातील तांडा वस्तीवर जाऊन संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन मिरवणूकीत सामील होऊन आनंद लुटत कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी त्यांनी अंबे वडगाव तांडा नंबर एक येथे भेट देऊन संत सेवालाल महाराजांच्या जयंती उत्सवात सामील झाले होते. यावेळी मा. श्री. अरुण भाऊ पवार, मा. श्री. मुकेश पाटील. यांची भेट घेतली.

ब्रेकिंग बातम्या