अंबे वडगाव परिसरात तिन वर्षानंतर आज प्रथमच कोरडा दिवस
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक=२२/११/२०२०
अंबे वडगाव येथील व परिसराच्या गावातील अवैधधंदे बंद व्हावे म्हणून अंबे वडगाव येथील ग्रामस्थ, महिला व चरणसिंग महारु राठोड यांनी आंदोलनाचा पावित्रा घेत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला निवेदन दिले होते.
या निवेदनाची दखल घेत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ.निताजी कायटे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह सतत धाडसत्र राबवून अंबे वडगाव, अंबे वडगाव खुर्द, अंबे वडगाव बुद्रुक या गावातील अवैधधंदे करणारांना सळोकीपळो करुन सोडल्याने व वरिल गावात ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांच्या उपस्थितीत अवैधधंदे करणारांची कान उघडणी केल्याने
आज दिनांक २२ नोव्हेंबर रविवारी गावपरिसरातील सर्व अवैधधंदे बंद झाल्याने गावपरिसरात शांतता होती.
तब्बल तिनव वर्षानंतर असे घडल्याने हा चमत्कारच म्हणावा लागेल असे पंचक्रोशीतुन जनतेतून बोलले जात आहे.
(यापुढे ही अवैधधंदे कायमस्वरूपी बंद रहावे अशी आशा व्यक्त करत ग्रामस्थ,महिला व लहानथोर मंडळीने पिंपळगाव हरेश्वर पोलिसांचे आभार मानुन धन्यवाद दिले आहेत)