पाचोरा शहर व तालुका भाजपा तर्फे उद्या विजबिल होळी आंदोलन

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक=२२/११/२०२०
लाकडाऊच्या काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ विजबिले आली.लॉकडाउनमुळे आर्थिक तणावाखाली असलेल्या जनतेला सरकारने मोठ्या विजबिलांचा शॉक दिला. याबाबत जन आक्रोश निर्माण झाल्यावर सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी जाहीर केले होते.
पण आता या सरकारच्या उर्जामंऊत्र्यांनी विजबिलाबाबत दिलासा देता येणार नाही व नागरिकांना विजबिल भरावे लागतील असे स्वता स्पष्ट सांगितले आहे.
दुसरीकडे महावितरण सक्तीने विजबिले वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासात केला आहे.
या सरकारला सत्तेच्या धुंदीतुन जागे करून जनतेला सवलत देणस भाग पाडण्यासाठी विरोधीपक्ष म्हणून आपण रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे.
म्हणून सोमवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विजबिलांची होळी करुन आंदोलन करावयाचे आहे. तरी समस्त नागरिक, शेतकरी बांधवांनी तसेच लोकप्रतिनिधी, पक्षाचे कार्यकर्ते या सर्वांनी कोरोणा पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करून भाजपा कार्यालय, बाजार समिती समोर १० वाजून ३० मिनिटापर्यंत जास्तीत जास्त संखेने एकत्र येऊन उपस्थित रहावे अशी नम्र विनंती
रमेश मुरलीधर वाणी (शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी)पाचोरा, माजी नगरसेवक नगरपरिषद पाचोरा व मा.श्री. अमोलभाऊ पंडितराव शिंदे तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी पाचोरा यांच्यातर्फे करण्यात आले आहे.,