शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा, संजय दादा गरुड यांचे आवाहन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/११/२०२३
सद्यस्थितीत निसर्गाचा लहरीपणा त्यातच शासनाचे शेतकऱ्यांविषयी नकारात्मक धोरण, संघटीत व्यापारी यामुळे शेतकरी शेतात राबराब, राबुन जेमतेम हाती आलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळत नाही, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई व पिक विम्याच्या जाचक अटी, नियम व शर्ती मुळे शेतकऱ्यांना पिक विम्याचा फायदा होत नसल्याने वर्षानुवर्षे शेतकरी कर्जाच्या बोजाखाली दबला जात असल्याने आजपर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत व आजही शेतकरी आत्महत्या थांबता, थांबत नाही. असे असले तरी एका बाजूला आजचे हे ‘तीन तिघाडा सरकार’ शेतकऱ्यांना कर्जमाफी, पुर्ण दाबाने व दिवसा विजपुरवठा देत नाही.
त्यातच खते, जंतुनाशके बि, बियाण्याच्या किंमतीचे नियोजन करत नसून बोगस खते व बियाणे विक्रेत्यांना पाठीशी घालत आहे. तर दुसरीकडे शेतमालाला योग्य भाव मिळत नाही तसेच मोठमोठ्या उद्योगपतींना कोटी रुपयांचे कर्ज माफ करत आहेत. म्हणून या हुकुमशाही व कुंभकर्ण झोपेत असलेल्या तिघाडी सरकारला जागे करण्यासाठी आज दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ गुरुवार रोजी जळगाव येथे आक्रोश मोर्चाचा आसुड घेऊन सरकारला जागे करण्यासाठी असंख्य शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन शेंदुर्णी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष मा. श्री. संजयजी दादा गरुड यांनी केले आहे.
म्हणून माझ्या प्रिय शेतकरी बांधवांनो येणाऱ्या ३० नोव्हेंबर २०२ रोजी जळगाव येथे दुपारी एक वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. जयवंत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान हे ध्येय मनात बाळगून आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण जळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त त्वरित जाहीर करावा, शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ पीक विम्याची रक्कम जमा करावी, कापसासह व सर्व शेतमालाला योग्य भाव द्यावा, यासह असंख्य मागण्यांसाठी, सरकारला जाब विचारण्यासाठी जळगाव जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांनी जळगाव येथे होणाऱ्या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष मा. श्री. संजय दादा गरुड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी आघाडी व जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केले आहे.