पाचोऱ्याची दिव्या जैन यांच्या चित्राची सारंगखेडा येथील प्रदर्शनात ज्यूरी पुरस्कारासाठी निवड.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/१२/२०२२
सारंगखेडा येथे दरवर्षी भरणाऱ्या यात्रेत घोड्यांचा बाजार प्रचंड मोठ्या प्रमाणात होतो. याच निमित्ताने या ठिकाणी चेतक फेस्टिवल राष्ट्रीय चित्र व शिल्प प्रदर्शन भरविण्यात येते. भारतातून जवळपास २० राज्यातून ८०० चित्रांचा सहभाग होतो त्यापैकी अंतिमफेरी साठी व चित्रप्रदर्शनासाठी २५० चित्रांची निवड केली जाते. या २५० चित्रांपैकी ठराविक चित्रे पुरस्कारासाठी निवडली जातात.
यावर्षी या चित्रप्रदर्शनात पाचोरा येथील रंगश्री आर्ट फाउंडेशनची विदयार्थीनी कु. दिव्या राहुल जैन हिच्या चित्राची ज्यूरी पुरस्कारासाठी निवड करण्यात येऊन ५०००/०० रुपये शिल्ड व प्रमाणपत्र देऊन तिला गौरविण्यात येणार आहे. चित्राचा विषय ‘घोड्यांचे इतिहासातील स्थान ‘हा होता. याविषयासाठी दिव्याने वारली चित्रकलेचा वापर केला आहे. यात तिने तिच्या कल्पकतेने इतिहासातील घोड्यांचे कुठे कुठे महत्व आहे हे शोधले. रामायणातील लवकुश यांनी अडवलेला घोडा, महाभारतातील भगवदगीता सांगितलेला प्रसंग,छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्र्याहून सुटका, महाराणा प्रताप यांच्या चेतक या घोड्याने मारलेली उंच उडी व शत्रुंना गाफील ठेवण्यासाठी घोड्याला हत्तीचा मुखवटा, झाशीची राणीची लढाई असे अभ्यासपूर्वक विषय मांडले आहे.पाचोऱ्यातील दुल्हन एम्पोरियम चे संचालक राहुल जैन यांची ती कन्या आहे. तिला सुबोध कांतायन सरांचे मार्गदर्शन लाभले.