शिंदाड येथील जिल्हा परिषद शाळेत गणवेश वाटप.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०२/२०२२
पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये आज दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ सोमवार रोजी सकाळी ११ वाजता शिंदाड गावचे प्रथम नागरीक सरपंच या.श्री. ज्ञानेश्वर तांबे अध्यक्षतेखाली व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.श्री. संदिप बोरसे यांच्या हस्ते
इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
या शुभ प्रसंगी ग्रामपंचायतीचे उपसरपंच व सन्माननीय सदस्य श्री. विलास पाटील, सौ. कांचन परदेशी, सौ. उज्वला पाटील श्री. बापू मोठे, श्री. स्वप्नील पाटील, लालबाबाई तडवी, तकदीर तडवी, शिक्षणतज्ञ धनराज पाटील, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य सौ. कविता तांबे, सुलताना तडवी, आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोजेक्टर जगताप सर यांनी केले तर आभार प्रदरू मालपुरे सर यांनी केले. या उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक प्रशांत पाटील व शिक्षक वृंद यांनी शालेय व्यवस्थापन समितीचे कौतुक केले.