बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने पाचोरा शहरातील प्रकाश टॉकीज मध्ये द केरला स्टोरी या चित्रपटाचे मोफत प्रदर्शन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०५/२०२३
हिंदू धर्मातील मुली व महिलांना जागृत करण्यासाठी बनवण्यात आलेला द केरला स्टोरी हा चित्रपट बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून पाचोरा येथील प्रकाश टॉकीज मध्ये दिनांक १४ मे २०२३ रविवार रोजी दिवसभर मोफत दाखवण्यात येणार आहे. कारण सद्यस्थितीत लव्ह जिहाद, धर्मांतरण व आतंकवाद वाढतच चालला आहे. हा गैरप्रकार रोखण्यासाठी व हिंदू धर्म जागृती करण्यासाठी द केरला स्टोरी हा चित्रपट सगळ्यांनी पाहून सावधगिरी व बोध घेणे गरजेचे आहे.
तरी महिला व मुलींनी जास्तीत, जास्त संख्येने येऊन हा चित्रपट आवश्य बघावा असे आवाहन विश्व हिंदू परिषद प्रखंड मंत्री योगेश सोनार, प्रखंड सह मंत्री दिपक राजपूत, उपाध्यक्ष प्रविण पाटील, बजरंग दल शहर संयोजक बंटी पाटिल, दुर्गा वाहिनी संयोजिका शुभागी मासरे, सह संयोजिका हेमलता पवार यांनी केले आहे.