भडगाव व पाचोरा शहरांची बंप्पर लॉटरी ;१५५ कोटी रुपयांच्या विकासनिधीस मान्यता, विविध कामांना मंजुरी – आ.किशोर पाटील यांच्या प्रयत्नांना यश .
![](https://satyajeetnews.com/wp-content/uploads/2024/03/featured-image-1.jpg)
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०२/२०३१
पाचोरा व भडगाव शहरतील विकासाच्या विविध योजनांसाठी आमदार किशोर पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून पुन्हा सुमारे १५५ कोटी रुपयांच्या विकास कामांना ना .एकनाथ शिंदे यांनी तातडीने मंजुरी दिली असून मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत पाचोरा भडगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, मुकुंद बिल्डींकर यांची उपस्थिती होती. दरम्यान ही बैठक ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती यात जळगाव येथून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, भडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे, पाचोरा मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर, पाणी पुरवठा अभियंता जितेंद्र मोरे,सहाय्यक नितीन पाटील, विलास देव यांची उपस्थिती होती. लवकरच या सर्व कामांना सुरुवात होणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले आहे.
या विकास कामात भडगाव शहरातील पाणी पुरवठा योजनांच्या कामांसाठी ५१ कोटी रुपये तर पाचोरा शहरातील वाढीव भागातील पाणी पुरवठा योजनेच्या कामांसाठी तब्बल ४१ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे तर पाचोरा शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी ४४ कोटी रुपयांच्या पहिल्या डीपीआरला मंजुरी मिळाली असून भूमीगत गटार योजनेच्या वाढीव कामांसाठी १९ कोटी रुपयांची मंजुरी प्रस्तावित आहेत.
ना.एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत आमदार किशोर पाटील यांनी विविध कामांसाठी लागणाऱ्या निधीचे सादरीकरण केले.त्यांच्या समवेत नगराध्यक्ष संजय गोहिल व मुकुंद बिल्डींकर यांनी देखील विविध मुद्दे मांडत ना. एकनाथ शिंदे यांना कामांची कल्पना दिली.या बैठकीला नगरविकास विभागासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.पाचोरा भडगाव मतदार संघात होत असलेल्या विकास कामांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत विकास कामासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे आश्वासन दिले.
कोट : महाविकास आघाडी सरकारच्या काळात विकास कामांची एक्सप्रेस सुसाट सुटली असून ना. एकनाथ शिंदे यांनी भडगाव व पाचोरा शहराच्या विकासासाठी भरीव निधी दिला असून पाचोरा शहराची स्मार्ट सिटी कडे वाटचाल सुरू असून लवकरच पाचोरा शहराच्या विकासाचा पॅटर्न राज्यात अव्वल ठरेल यात शंका नाही.