निंभोरा येथे कोरोना लसीकरनाला यशस्वी सुरुवात.

गोंदेगाव ता.सोयगाव (प्रज्वल चव्हाण)
दिनांक :- २२/०४/२०२१
आज निंभोरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे CORONA VACCINE चे लसीकरणाला यशस्वी सुरुवात झाली असून पहिली लस गावातील जेष्ठ नागरिक श्री.जगतराव अण्णा पाटील यांना देण्यात आली. तरी आपल्या गावातील व घरातील सदस्य वय वर्षे ४५ च्या पुढील सर्व जेष्ठ नागरिकांना लस देण्यात आली .
या लसीकरणासाठी , आरोग्य सेवक ए.एन.बोरसे ,आरोग्य सेविका व आशा सेविका यांनी अथक परिश्रम घेतले.
याप्रसंगी निंभोरा येथील सरपंच सौ. चंद्रकला भगवान निकम, ग्रामपंचायत सदस्य गोरख पाटील, रमेश निकम, कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना जिल्हाध्यक्ष मयूर पाटील ,व निलेश पाटील ,वेदांत सोनवणे हे उपस्थित होते. तसेच सर्व गावकऱ्यांनी स्वतः शंभर टक्के लसीकरण करुन घेत आपल्या आरोग्याची तसेच गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही. याची काळजी घेऊन शासन, प्रशासन व आरोग्य विभागाला सहकार्य करावे अशी विनंती सरपंच, सदस्य, पोलीस पाटील व आरोग्य विभागातर्फे निंभोरा ग्रामस्थांना विनंती करण्यात आली असून सोशल डिस्टन्सींगचे नियम पाळत घराबाहेर निघतांना तोंडाला मास्क लावा, हस्तांदोलन टाळा, विवाह सोहळे व इतर कार्यक्रम शासनाने ठरवून दिलेल्या अटी नुसार पार पाडून सुरक्षितता पाळावी जेणेकरून स्वतः व गाव सुरक्षित राहील असे सुचित करण्यात आले.