जामनेर तालुक्यातील पहाडी बाबा यात्रेत चादर चढवण्याचा मान दिपक राजपूत यांना.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०२/२०२३
जामनेर तालुक्यातील हिंदू, मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या पहाडी बाबांचा यात्रा उत्सव सालाबादप्रमाणे यंदाही साजरा करण्यात आला. यावेळी वाजतगाजत मिरवणूक काढून शिवसेनेचे दबंग जिल्हाप्रमुख मा. श्री. दिपक भाऊ राजपूत यांच्या हस्ते पहाडी बाबांना चादर चढवण्यात आली.
या मिरवणुकीत ढोल ताश्याच्या वाद्यात भाविक, भक्तांनी ठेका धरत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मा. श्री. दिपक राजपूत यांना खांद्यावर घेऊन एकप्रकारे मिरणूकच काढली. याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मा. श्री. उध्दव भाऊ मराठे, जामनेर तालुकाप्रमुख मा. श्री. ॲड. मा. श्री. बोरसे दादा, एम. माणूस, शहरप्रमुख मनोज माळी, शहर संघटक उस्मान मामू, मनोज भाऊ मिस्तरी, कट्टर शिवसैनिक मनोज भाऊ मिस्तरी, सइद भाई, इम्रान भाई, अक्षय राणा सह असंख्य शिवसैनिक व भाविक भक्त उपस्थित होते.