चाळीसगाव परिसरात ढगफुटी, गिरणा कोपली.

दिलिप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/०८/२०२१
चाळीसगाव परिसरात ढ़गफुटी; वाकडी, मुंदखेडा शिवारातून दोनशे गुरे वाहिली
चाळीसगाव शहरातून जाणाऱ्या डोंगरी व तितुर नदीला मोठ्या प्रमाणात अचानक पाणी आल्याने अर्धे चाळीसगाव शहर पाण्याखाली आले आहे. सकाळी चाळीसगावकर साखर झोपेत असतांनाच अचानक पुराचे पाणी आल्याने अनेक नागरीकांची भंबेरी उडाली.
चाळीसगाव तालुक्यात मोठ्या जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे गिरणा धरणाखालील गिरणा नदी, उपनद्यांना व नाल्यांना मोठा पूर आलेला आहे. छोटे-मोठे बंधारे पाझर तलाव व इतर छोट्या-मोठ्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
मध्यरात्रीचे थैमान
चालीसगांव तालुका परिसरात अनेक गावंमध्ये मध्यरात्रीनंतर पावसाचे थैमान सुरु झाले. यात मुंदखेड़ा, वाकळी, रोकड़े, पानगांव, बोरखेड़ी या गावंना पुराचा वेढा आहे. यातील वाकळी गावतुन दोन ट्रॅक्टर व २०० गुरे वाहून गेल्याची शक्यता वर्तविन्यात आली आहे. यामुळे अद्यापपर्यंत नुकसानीचा अंदाज आलेला नाही. नदी पात्र उथळ झाल्याने शहरात पाणी शिरले.
सतर्कतेचा इशारा
पुराचे पाणी गिरणा नदीत येऊन मिळत आहे. सद्यस्थितीत आता जामदा बधार्यावरून १५०० क्यूसेक पाणी जात असून दुपारनंतर त्यात मोठी वाढ येऊन पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
गिरणा नदी काठावरील गावांना याद्वारे थोक्याचा इशारा देण्यात येत आहे. भडगाव व पाचोरा तालुक्यातील गिरणा नदी पात्रात ३१ ऑगस्टला दुपारनंतर पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. तरी सखल नदीकाठावरील जळतंन, सामान, चारा तसेच रहिवास तसेच गुरेढोरे हे तातडीने उंच जागी हलवावे व सावध असावे. ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती व महसूल प्रशासनाने योग्य ती काळजी घेऊन सर्वांना अवगत करावे.असे गिरणा पाटबंधारे उपविभाग चाळीसगाव यांनी कळविले आहे.