मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा पाचोरा दौरा ९ सप्टेंबर ऐवजी आता १२ सप्टेंबरला.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०९/२०२३
राज्य सरकारने शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरु केला असून या उपक्रमातून शासनाच्या लोककल्याणकारी योजना व व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा लाभ गरजू नागरिकांना मिळावा व या योजनांचा लाभ घेण्यासाठी गरजूंना कार्यालयात खेटे घालावे लागणार नाहीत हा हेतू डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनाच्या वतीने राज्यभर शासन आपल्या दारी या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा निहाय सुरु केले आहे.
याच शासन आपल्या दारी या महत्वाकांक्षी कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे प्रथमच तालुकास्तरीय शासन आपल्या दारी हा उपक्रम दिनांक ०९ सप्टेंबर २०२३ शनिवार रोजी राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथराव शिंदे साहेब व इतर दहा मंत्र्यांच्या उपस्थितीत घेण्याचे ठरविण्यात आले होते. परंतु त्याच दिवशी काही कामानिमित्त मुख्यमंत्र्यांना अचानकपणे दिल्ली जावे लागत असल्याने दिनांक ०९ सप्टेंबर २०२३ शनिवार रोजी घेण्यात येणारा शासन आपल्या दारी हा महत्वाकांक्षी कार्यक्रम आता १२ सप्टेंबर २०२३ मंगळवार रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती पाचोरा, भडगाव तालुक्याचे आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांनी नुकतीच एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे प्रसारमाध्यमांना दिली आहे.
——————————————————————-
१२ सप्टेंबर २०२३ मंगळवार रोजी शासन आपल्या दारी या उपक्रमाला उपमुख्यमंत्री यांचेसह सुमारे दहा मंत्र्यांची लाभणार उपस्थिती. आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील.
——————————————————————–
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे शासन आपल्या दारी या तालुकास्तरीय कार्यक्रमाचे दिनांक २६ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले होते. परंतु राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस व अजित पवार यांच्या कार्यव्यस्ततेमुळे जळगाव जिल्ह्यातील तालुकास्तरावरीय शासन आपल्या दारी हा २६ ऑगस्ट रोजी आयोजित केलेला कार्यक्रम स्थगित झाला होता. तदनंतर हा दौरा ०९ सप्टेंबर २०२३ शनिवार रोजी होईल असे जाहीर केले होते. मात्र असे जाहीर केले असले तरी काही कामानिमित्त मा. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना अचानकपणे दिल्ली जावे लागत असल्याने नाईलाजास्तव आता पुन्हा एकदा शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या तारखेत बदल करुन हा कार्यक्रम १२ सप्टेंबर २०२३ मंगळवार रोजी निश्चित होणार असल्याची माहिती एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांनी नुकतीच दिली असून या पाचोरा, भडगाव तालुकास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमासाठी ना. श्री. एकनाथराव शिंदे यांचेसह उपमुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ना. गिरीश महाजन, ना. अनिल पाटील, ना. अब्दुल सत्तार, ना. दादा भुसे, ना. डॉ. तानाजी सावंत यांच्यासह संपुर्ण मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री यांची उपस्थिती लाभणार असल्याचे सांगितले आहे.
शासन आपल्या दारी या महत्वाकांक्षी कार्यक्रासह पाचोरा व भडगाव तालुक्यातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरु असलेल्या नगरदेवळा येथील औद्योगिक वसाहत, पाचोरा येथील उपजिल्हा रुग्णालय, क्रीडा संकुल, ऑक्सिजन पार्क या सह विविध विकास कामांचे देखील भूमिपूजन व उद्घाटन केले जाणार आहेत. शिवाय पाचोरा व भडगाव तालुक्यातील सुमारे पंधरा हजार लाभार्थ्यांना विविध शासनाच्या योजनांचा लाभ देण्याचे नियोजन प्रशासन स्तरावर केले असुन याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह आ. किशोर अप्पा पाटील व प्रांताधिकारी भूषण अहिरे यांनी या पूर्वीच सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नियोजन केले आहे.
*चौकट*
पाचोरा येथील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम आटोपल्यावर पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील नर्मदा ऍग्रो या फॅक्टरीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांचे हस्ते होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री व सर्व मंत्रीगण, खासदार, आमदार व सर्व प्रमुख मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील सुमारे दहा ते बारा मंत्र्यांची उपस्थिती लाभणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. असल्याची माहिती आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांनी दिली आहे.