पाचोरा शहरात देवदूत बनले लुटारु, गरज नसतांना नको त्या तपासण्या, ऑपरेशन व औषधोपचार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०२/२०२३
आयुष्यात आरोग्याविषयी जेव्हा, जेव्हा काही समस्या उद्भवतात तेव्हा सर्वसामान्य माणसाला प्रथम आठवतो तो देव व नंतर आठवते ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर व डॉक्टर म्हणजे अशी व्यक्ती कि ती त्याच्या प्रयत्नांनी यमदूतालाही परत पाठवू शकते म्हणूनच की काय डॉक्टरांना देवदूत म्हणतात. परंतु आजच्या परिस्थितीत सगळेच नाही परंतु काही डॉक्टर झटपट श्रीमंत होण्यासाठी रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याचे निदर्शनास येत असल्याने अश्या काही दोन, चार डॉक्टरांमुळे वैद्यकीय क्षेत्र बदनाम होत आहे.
असाच काहीसा प्रकार पाचोरा शहरातील एका नामांकित डॉक्टरांनी केला असून मुलाच्या तपासणीचा अहवाल चुकीचा देऊन व ऑपरेशन तातडीने करावे लागेल असे सांगून रुग्णाच्या मुलाच्या नातेवाईकांच्या मानसिकतेचे खच्चीकरण करुन पालकांना घाबरवल्या प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली असून हे प्रकरण विधीतज्ञ ॲड. कविता मासरे हाताळत असल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता संबंधित पक्षकाराने पाचोरा येथील डॉक्टरांनी केलेले चुकीचे मार्गदर्शन व निदान याबबतची योग ती कागदपत्रे व वैद्यकीय अहवाल तसेच एक्सरे विधीतज्ञ ॲड. कविता मासरे यांच्याकडे सुपुर्द केली असून सदर प्रकरणी कायदेतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे प्रकरण हाताळत असून पवित्र अशा वैद्यकीय क्षेत्रात चुकीचे काम करणाऱ्या डॉक्टरवर योग्य ठिकाणी किंवा महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे तक्रार दाखल करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तसेच रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉक्टरांवर कठोरात, कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून होत असल्याने चुकीला माफी नाही अशी भूमिका ठेऊन अश्या डॉक्टरांचा बुरखा फाडणार असल्याचे विधीतज्ञ ॲड. कविता मासरे यांनी सांगितले असून याबाबत आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषदेत त्या सविस्तर माहिती देणार आहेत.