दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०१/२०२३

पाचोरा येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा, भडगाव व पाचोरा तालुका सहकारी शिक्षणसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या दिनांक २० जानेवारी २०२३ शुक्रवार रोजी सकाळी १० ते ११ वाजे दरम्यान श्री. शेठ एम. एम. महाविद्यालय पाचोरा येथे रस्ते सुरक्षाविषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात जळगाव येथील उप परिवहन अधिकारी श्री. श्याम लोही साहेब हे युवकांना मार्गदर्शन करतील. पी. टी. सी. शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांच्या हस्ते या व्याख्यानाचे उद्घाटन होईल. याप्रसंगी आर.टी.ओ. इन्स्पेक्टर हेमंत शिवाजीराव सोनवणे, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. अमोल जाधव, सेक्रेटरी डॉ. गोरख महाजन उपस्थित राहतील.

तरी महाविद्यालयीन युवक- युवती व पाचोरा शहर आणि तालुक्यातील युवकांनी व वाहनधारकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रोजेक्ट डायरेक्टर रोटेरियन निलेश कोटेचा व प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर शिवाजी शिंदे व संयोजक प्रा. जे. व्ही. पाटील यांनी केले आहे.