दिव्यांग व विधवा महिलेची घरकुलासाठी चाळीस वर्षापासून फरफट. येथे पाहिजे पक्षाचे वेड्या, गबाळ्याचे काम नव्हे.
सुनील लोहार.(कुऱ्हाड)
दिनांक~३०/०३/२०२२
काही वर्षांपूर्वी लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर फक्त आणि फक्त समाजहित व समाजसेवा डोळ्यासमोर ठेवून आपले काम करत होते. त्यावेळेस त्यांना न कोणता स्वार्थ होता ना कोणताही लोभ. परंतु आता काही वर्षापासून सगळेच राजकारणी आपल्या पदावर आरुढ होण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत असतात. व हे करत असताना मतांची बँक भक्कम व्हावी म्हणून सगळेच राजकारणी आपल्या कार्यकर्त्यांची संख्या कशी वाढेल व मतदानात कशी भर पडेल याकरिता सत्ता आल्यावर सगळे नियम धाब्यावर बसवून आपले झेंडे घेऊन फिरणाऱ्या तसेच आपल्या मागे फिरून टाळ्या वाजवत उदोउदो करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी विविध योजना देत असतात.
यामुळे खरा कष्टकरी, राबराब राबणारा गरीब, हा आपला पोटाची भूक भागवण्यासाठी धडपडत असताना यांच्याकडून संबंधितांचा जयजयकार होत नसल्याने अश्या राजकारणापासून चार हात लांब असलेल्या लोकांना शासनाचे घरकुल, स्वस्त धान्य, अपंगांच्या सवलती, विधवा महिलांचे मानधन असो किंवा इतर सवलती मिळवण्यासाठी कार्यालयात वर्षानुवर्षे खेटे घालावे लागतात. कारण कारण सत्य पुढे शहाणपण चालत नाही मग या संधीचा फायदा घ्या काही धूर्त अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करत चिरीमिरी घेऊन वेगवेगळ्या सवलतीत बसत नसले तरी त्यांना या सवलतींचा लाभ देऊन मोकळे होतात.
आपली आपबीती सांगतांना पिडीत महिला.
असाच काहीसा प्रकार पाचोरा तालुक्यात सुरू असून कुऱ्हाड येथून जवळ असलेल्या साजगाव येथिल कलाबाई सुभाष कोळी या अपंग, विधवा, मागासवर्गीय जेष्ठ महिलेस मौजे साजगाव ग्रामपंचायत जाणूनबुजून घरकूल योजने पासून वंचित ठेवत आहे. या महिलेस इंदिरा आवास योजने अंतर्गत २०१५ ला ग्रामपंचायत ठरावानुसार घरकुल मंजूर झालेले आहे. परंतु लाभार्थी जवळ स्वताची जागा नसल्याने ग्रामपंचायत जाणून बुजून महिलेस पैशाची मागणी करीत आहे.
शासनाच्या परिपत्रकानुसार अटी व शर्ती चा भंग करीत महिलेस घरकुल योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. सदर ही ज्येष्ठ महिला दिव्यांग व विधवा असून बेचाळीस वर्ष पासून भाड्याच्या घरात राहत आहे. तरी लवकरात लवकर या महिलेस घरकुल मिळावे म्हणून मागणी होत आहे. या महिलेस घरखु न मिळाल्यास भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटने तर्फे आंदोलन छेडण्यात येणार असून पाचोरा तहसील कार्यालय समोर उपोषण देखील करण्यात येणार असल्याचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले.
पाचोरा तालुक्यात घरकुलाच्या यादित मोठ्याप्रमाणात घोळ होत असून, जे खरोखर पात्र लाभार्थी आहेत त्यांना घरकुलाच्या “ड” यादितून वगळून अपात्र लाभार्थ्यांना यादित नावे घेण्यात आलेली आहेत, यात केवळ राजकारण होत असल्याचा आरोप देखील करण्यात येत आहेत. या संदर्भात पाचोरा तहसीलदार मा. श्री. कैलासजी चावडे यांना भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोष संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले असून या संदर्भात शासन प्रशासना तर्फे लवकर न्याय मिळवा अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटना महाराष्ट्र राज्यचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष संतोष पवार, बहुजन मुक्ती मोर्चाचे प्रचारक नंदलाल आगारे,चर्मकार महा संघाचे तालुका अध्यक्ष,गंगाराम तेली, चर्मकार विकास संघाचे रमेश पवार, रविंद्र कोळी भ्र. वि. ज. आ. संघटनेचे प्रशांत कोळी हे उपस्थित होते.
या महिलेसह इतर तीन लोकांची ब यादीत घरकुल मंजूर झालेली असून यांना जागा नसल्याने त्यांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचे कडे पाठवत तो मंजूर होऊन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला प्रत्येक लाभार्थी ने दहा टक्के १७२०० इतकी रक्कम भरून तहसीलदार पाचोरा यांच्या आदेशाने जागा वाटपाचे काम होऊन नंतर घरकुल योजनेचे बांधकाम सुरू होईल असे साजगव ग्रामसेवक श्री.वासुदेव पाटील यांनी प्रतिनिधीशी शी बोलताना सांगितले.