सातगाव, पिंप्री येथे उद्या जि.प.सदस्य यांच्या उपस्थितीत विविध कामांचे भूमिपूजन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०२/२०२२
पिंपळगाव- शिंदाड जिल्हापरिषद गटाचे तसेच विकास कामांचा धडाका सुरू ठेवणारे सर्वांचे लाडके व लोकप्रिय जिल्हापरिषद सदस्य मा.श्री. मधुकर भाऊ काटे यांच्या हस्ते उद्या दिनांक १६ फेब्रुवारी बुधवार रोजी ४८ लाखांच्या विकास कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होत असून परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच यांनी केले आहे.
पिंपळगाव हरेश्वर- शिंदाड जिल्हापरिषद गटाचे सदस्य जनमाणसात कमी कालावधीत लोकप्रिय झालेले मा.श्री. मधुकर भाऊ काटे यांनी गटातील गावांचा मोठ्या प्रमाणात विकास केला असून, आज सातगाव डोंगरी येथील दलित वस्तीसुधार योजनेअंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण, गटार, तसेच शौचालयासाठी २३ लाख रुपये तर पिंप्री ता. पाचोरा येथील दलित वस्तीसाठी रस्ता कॉंक्रिटीकरण व गटारीसाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून त्याचे आज भूमिपूजन होत आहे. दोन्ही गावातील नागरिकांनी सकाळी पिंप्री येथे सकाळी नऊ वाजता तसेच सातगाव डोंगरी येथे दहा वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंचांनी केले आहेत.