आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा तालुक्याची आमसभा घ्यावी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक विकास पाटील यांचे आवाहन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/१२/२०२२
आमसभा म्हणजेच लोकशाहीचा आधारस्तंभ व जनमतासाठीचा खुला मंच म्हणून आमसभेला खुपच महत्व आहे. कारण आमदारांच्या आमसभेत शहरी तसेच ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजून घेत त्यावर त्वरित उपाययोजना करुन जनतेच्या अडिअडचणी सोडविण्यासाठी आमसभा घेणे अत्यंत गरजेचे व महत्त्वाचे असते परंतु पाचोरा, भडगाव विधानसभा निवडणुक व आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील हे आमदार म्हणून विराजमान झाल्यापासून तीन वर्षे पूर्ण होत आहेत.
परंतु तीन वर्षांचा कालावधी लोटला गेला असला तरी आजपर्यंत आमसभा घेण्यात आली नसल्याने पाचोरा शहरासह पाचोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे बरेचसे प्रश्न मार्गी लागलेले नाहीत. यासाठी नगरपालिका, ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती, जिल्हापरिषद, तहसील तसेच प्रांत कार्यालय, सि. टी. सर्व्हे, वनविभाग, विद्युत वितरण कंपनी, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, अन्न व औषध प्रशासन, स्वस्त धान्य दुकान, महत्वाचे म्हणजे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलीस विभाग यांच्या बाबतीत जनतेतून आलेल्या तक्रारी, पाचोरा तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चिललेले अवैध धंदे, शासनाच्या विविध योजनांची माहिती, झालेली विकासकामे व राहिलेली विकास कामे, तालुक्यातील शैक्षणिक दर्जा, आरोग्य योजनांची माहिती व सुविधा जाणून घेण्यासाठी व त्या सोडविण्यासाठी आमसभा महत्वाची असते परंतु सतत तीन वर्षे उलटली तरी आमसभा घेतली नसल्याने पाचोरा शहरासह ग्रामीण भागातील जनता त्यांच्या हक्कांपासून वंचित असल्याने तसेच कामचुकार, मनमानी कारभार करणारे ग्रामसेवक, विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी यांची तक्रार करुन पोलखोल करण्यासाठी आमसभा घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा पाचोरा नगरीचे नगरसेवक मा. श्री. विकास पाटील यांनी व्यक्त करत आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांनी त्वरित आमसभा घ्यावी असे आवाहन केले आहे.
तसेच आमसभा घेण्याआधी आमसभेची दिनांक, वेळ, वार ठरवून याचा पाचोरा शहरासह पाचोरा तालुक्यातील प्रत्येक गावात प्रचार व प्रसार करुन जनतेला सुचित करावे म्हणजे पाचोरा शहरासह तालुक्यातील प्रत्येक खेडेगावातील नागरिकांना आपल्या अडिअडचणी व महत्वाचे प्रश्न उपस्थित करतात येतील असे सुचवले आहे.