पाकीस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल झरदारी यांचा पाचोऱ्यात भाजपातर्फे जाहिर निषेध.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/१२/२०२२
पाकीस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताविषयी केलेल्या तर्कहिन आणि लज्जास्पद विधानाचा आज १७ डिसेंबर २०२२ शनिवार रोजी पाचोरा शहरातील श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाचोरा, भडगाव तालुक्यातील भारतीय जनता पार्टीतर्फे जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला. शहरातील भाजपा कार्यालयातुन सकाळी ११ वाजता निषेधार्थ मोर्चा काढत निषेध करण्यात आला. या मोर्चात सहभागी आंदोलन कर्त्यांनी “पाकीस्तान मुर्दाबाद”, होश में आयो, होश में आयो, पाकीस्तान होश में आयो, “प्रधानमंत्री का अपमान नही सहेंगा हिंदुस्थान” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोर्चा आल्यानंतर उपस्थित मोर्चेकरांनी पाकीस्तानाच्या निषेधार्थ बनविण्यात आलेले बॅनरची होळी करत तीव्र निषेध नोंदविला. याप्रसंगी भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन, पंचायत समितीचे मा. सभापती बन्सीलाल पाटील, मा. नगरसेवक रविंद्र पाटील, तालुका सरचिटणीस प्रदिप पाटील, भाजपा शहर अध्यक्ष रमेश वाणी, भाजपा युवामोर्चाचे शहर अध्यक्ष समाधान मुळे, दिपक माने, योगेश ठाकुर, भैय्या भाऊ पाटील, राधेश्याम अग्रवाल, सचिन संचेती, राहुल गायकवाड, पिंटु चौधरी, सिद्धांत पाटील सह मोठ्या संख्येने पाचोरा व भडगाव तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.