यवतमाळ.(प्रतिनिधी)
दिनांक~१५/१२/२०२२

पुणे येथील एका कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत पाटील यांच्यावर भीमसैनिक मनोज गरबडे यांनी चंद्रकांत दादा पाटील यांचे कडून महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांबद्दल अपमानजन्य वक्तव्य केल्याचे निषेधार्थ पुणे येथे त्यांच्यावर शाही फेकण्यात आली या घटनेचे चित्रीकरण वृत्तांकन करण्याचे दृष्टीने पुणे येथील न्यूज एटीन लोकमतचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी केले असता सदर प्रकरणात गोविंद वाकडे यांना सामील असल्याचा खोटा आरोप करून पत्रकार गोविंद वाकडे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस प्रशासनाचा व हुकूमशाही प्रवृत्ती विरोधात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांनी शासनाला निवेदन दिले आहे.

पत्रकार विरोधात केलेला कट हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभावर घाला घालण्यात आला असून महाराष्ट्रातील पत्रकार कदापिही सहन करणार नाहीत. पत्रकार गोविंद वाकडे यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ उमरखेड च्या वतीने उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार उमरखेड यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल राठोड, युवा जिल्हाध्यक्ष मारुती गव्हाळे, तालुका अध्यक्ष विलास चव्हाण, जिल्हा सचिव सुनील ठाकरे, तालुका सचिव बाबा खान, जिल्हा उपाध्यक्ष संदेश कांबळे, गजानन भारती, हरिदास इंगोलकर, सविताताई चंद्रे ,अर्चना भोपळे, शेख इरफान, प्रवेश कवडे, राजू गायकवाड, अशोक गायकवाड व संघटनेचे सदस्य उपस्थित होते.