वरखेडी गावाजवळ डंपरला अपघात, दुसरे वाहन कोणते ?
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/१२/२०२२
पाचोरा ते जामनेर रस्त्यावर वरखेडी, अंबे वडगाव दरम्यान वरखेडी येथील जुन्या ऑईल मिल जवळ आज सकाळी एक अपघातग्रस्त डंपर आढळून आले आहे. या डंपरची परिस्थिती पाहता या अपघातात मोठ्याप्रमाणात डंपरचे नुकसान झाल्याचे दिसून येत असून या अपघातात कदाचित ड्रायव्हर, क्लिनर किंवा कामावरील मजूरांना जबर मार लागला असावा असा अंदाज घटनास्थळी जमलेल्या जानकर नागरिकांनी व्यक्त केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता हा डंपर बहुतेक चोरटी वाहतूक करणारा असावा असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच हा एवढा भिषण अपघात असल्यावर ही अपघातस्थळी एकच डंपर उभे असल्यामुळे दुसरे वाहन जागेवरुन पसार झाले आहे. या घडामोडींमुळे जानकार वाहन चालकांच्या मते अपघातग्रस्त जागेवर उभ्या असलेल्या डंपर चालकाने पुढे समोर चालत असलेल्या वाहनाला मागाहून जोरदार धडक दिली असावी व ज्या वाहनावर हे डंपर धडकले त्या वाहनाचा चालक व मालक नहाकच झंझट नको म्हणून घटनास्थळी न थांबता निघून गेले असावेत असा अंदाज व्यक्त केला आहे. कारण जर का दोघह वाहनांची समोरासमोर धडक झाली असती तर दुसऱ्या वाहनांचीही समोरच्या बाजूला मोडतोड होऊन तेही जागेवर थांबले असते असे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे पाचोरा ते जामनेर रस्त्यावरुन दररोज रात्री मोठ्या प्रमाणात चोरटी वाळू वाहतूक केली जात असून ही वाळू वाहतूक करतांना महसूल विभागाला हुलकावणी देण्यासाठी वाळूने भरलेली वाहने भरधाव वेगाने चालवली जातात यामुळे रात्रीच्या वेळी इतर वाहनधारकांना कट मारणे, आपले वाहन कोणते आहे हे लक्षात येऊ नये म्हणून डंपर च्या हेड लाईटचा प्रकाश प्रखर ठेऊऊ समोरच्या वाहनधारकांना आपले वाहन बाजूला घेण्यासाठी भाग पाडणे असा जीवघेणा खेळ सुरु असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.