४७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्री. महासर माता राइस मिलच्या तीन कर्मचाऱ्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी. भाग २

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०१/२०२३

पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील श्री. महासर माता राइस मिलमध्ये कामाला असलेल्या आठ कर्मचाऱ्यांनी संगनमताने २५० क्विंटल तांदळाच्या बनावट पावत्या बनवून तांदूळ खरेदी केल्याचा बनाव करुन कंपनीला ४७ लाखात फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर श्री. महासार माता राइस मिलचे महाव्यवस्थापक रामेश्वर कुमार केवट (वय ३३) यांनी पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर २५/२०२३ भा. द. वी. २४०, ४०६, ४६७, ४६८, १२० बंद अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्री. महासर माता राइस मिलचे व्यवस्थापक यांनी फिर्यादीत दिलेल्या आठ संशयित आरोपींपैकी पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे यांनी सुमित सिंह, सूरज सिंह, हुकुम सिंह या तीन संशयित आरोपींना अटक करुन आज पाचोरा न्यायालयात हजर केले असता या तीनही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे हे करीत आहेत.

महत्वाचे~
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील श्री. महासर माता राइस मिलचा संपूर्ण लेखाजोखा (चोरावर मोर) या शीर्षकाखाली भाग ३ मध्ये लवकरच आपल्या समोर.

ब्रेकिंग बातम्या